Home | National | Delhi | Arvind Kejriwal Delhi Chief Minister Blue Wagon R Stolen

दिल्लीच्या CMच्या निळ्या कारची सचिवालयाजवळून चोरी, अनेक आंदोलने याच कारमधून केली

वृत्तसंस्था | Update - Oct 13, 2017, 02:04 AM IST

केजरावाल यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरु केले होते, तेव्हापासून ते या कारचा वापर करत होते.

 • Arvind Kejriwal Delhi Chief Minister Blue Wagon R Stolen
  दिल्ली सचिवालयाजवळून मुख्यमंत्री केजरीवालांची कार चोरीला गेली.
  नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची वॅगन आर कार गुरुवारी दिल्ली सचिवालयासमोरून चोरीस गेली. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत केजरीवाल ही निळ्या रंगाची कार वापरत होते. सध्या ही कार पक्षाच्या माध्यम समन्वयक वंदना सिंह वापरत होत्या. ही कार सॉफ्टवेअर इंजिनिअर कुंदन शर्मा यांनी जानेवारी २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल यांना दिली हाेती.
  आयकॉनिक आहे केजरींची कार
  अरविंद केजरीवाल यांची ब्ल्यू व्हॅगन आर कार आयकॉनिक आहे. केजरावाल यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरु केले होते, तेव्हापासून ते या कारचा वापर करत होते. त्यांच्या अनेक बऱ्या-वाईट प्रसंगाची ही कार साक्षीदार होती.
  समर्थक म्हणाला होता- ही कार माझी, परत करा
  - आम आदमी पार्टीच्या एका समर्थकाने 2015 मध्ये दावा केला होता, की त्यांनी 2013 मध्ये अरविंद केजरीवाल यांना ही कार भेट दिली होती.
  - जेव्हा पक्षात मतभेद झाले तेव्हा कुंदन शर्मा नावाच्या या व्यक्तीने कार परत मागितली होती. कुंदन सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
  - आपने प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांना पक्षातून काढले त्यामुळे कुंदन नाराज होते. त्यांनी ट्विट करुन आपली नाराजी व्यक्त केली होती.
  - केजरीवाल प्रथम 49 दिवस मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते हीच कार वापरत होते. त्यानंतर त्यांनी ही कार हरियाणाचे आपचे नेते नवीन जयहिंद यांना दिली होती. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान नवीन यांनी याच कारमधून रोहतकमध्ये पक्षाचा प्रचार केला होता.
 • Arvind Kejriwal Delhi Chief Minister Blue Wagon R Stolen
  मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी केजरीवाल याच कारने गेले होते.

Trending