आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Had Sought Two 5 Bedroom Houses Latest News

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर केजरीवालांनी मागितला होता \'आलिशान बंगला\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणखी एका वादात अडकण्याची शक्यता आहे. त्यांच्या संदर्भातील नवा वाद हा पुन्हा एकदा त्यांच्या बंगल्यासंदर्भातील आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल यांनी आलिशान बंगल्याची मागणी केल्याची कागदपत्रे मिळाली आहेत. या कागदपत्रांनुसार मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून उपराज्यपाल नजीब जंग यांना पत्र पाठवून, भगवानदास मार्गावरील दोन बंगल्यांची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर केवळ 48 तासांत त्यांनी ही मागणी केली होती.
केजरीवाल यांच्या मागणीनंतर त्यांना पाच-पाच रुम्सचे दोन ड्युप्लेक्स देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे दिल्लीत मोठे वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर शहर विकास मंत्रालयाने लुटियंस झोन येथील टिळक मार्गावरील प्लॅट त्यांना दिला आहे. काही दिवसांपूर्वीच केजरीवाल आणि त्यांचे कुटुंब या नव्या घरात दाखल झाले आहे. केजरीवाल यांचे नवे घर हे बंगला नसून फ्लॅट आहे. हा फ्लॅट तीन बेडरुमचा आहे.

असा सुरु झाला होता वाद
कौशिंबी येथे फ्लॅटमध्ये राहाणारे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांच्यासाठी घराचा शोध सुरु झाला होता. भगवानदास रोडवरील डबल ड्युप्लेक्स मुख्यमंत्र्यांसाठी योग्य असल्याचे समजून त्यांची डागडुजी आणि नुतनीकरण सुरु झाले होते. सुत्रांची माहिती आहे, की केजरीवालांना देखील हा बंगला पसंत होता. कुटुंबियांसह त्यांनी बंगल्याची पाहाणी देखील केली होती. मात्र, बंगल्याच्या आकारावरुन वादंग सुरु झाला. सरकारी बंगला आणि लाल दिव्याची गाडी वापरणार नाही असे निवडणुकीआधी आपच्या नेत्यांनी म्हटले होते. त्यांचे हे वर्तन त्यांच्या वक्तव्याशी सुसंगत नसल्याचे सांगत दिल्लीकरांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्यांनी ड्युप्लेक्स बंगल्यात राहाण्यास नकार दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसाठी घराचा शोध सुरु झाला होता.
छायाचित्र - मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उपराज्यपालांकडे बंगल्याची मागणी केलेले पत्र

पुढील स्लाइडमध्ये, केजरीवालांनी अनिल अंबानींवर साधला निशाणा