आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Has Written A Letter To Narendra Modi

गॅस दरवाढ थांबवण्यासाठी राहुल-मोदी काय करणार? अंबानींशी संबंधांचा खुलासा करा - केजरीवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी गॅस दरवाढीचा मुद्दा उपस्थित करून पुन्हा एकदा राहुल गांधी व नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. गॅस दरवाढ थांबवण्यासाठी हे दोन्ही नेते काय करणार, याचे स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत केजरीवाल यांन गॅस दरवाढीसोबत काळ्या पैशाचा मुद्दाही मांडला. परदेशातील बँकांत दडवून ठेवलेला काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी दोन्ही नेते काय कारवाई करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मोदींना पत्र
केजरीवाल यांनी गॅस दरवाढीबाबत मोदींना पत्र लिहून भूमिका मांडावी, असे आवाहन केले आहे. आपण पंतप्रधानपदाचे उमेदवार आहात. आम आदमीला कळू द्या की गॅस दरवाढ थांबवण्यासाठी आपण काय करणार, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
असेच पत्र आपण राहुल गांधी यांना पाठवणार असल्याचेही केजरीवाल म्हणाले.