आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍लीकरांना 666 लिटर पाणी फुकट, मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा निर्णय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीचे नवे सीएम अरविंद केजरीवाल यांनी आजारपणामुळे आज (सोमवारी) रजा घेतली. तरीही त्‍यांनी थोडे बरे वाटल्‍यावर एक बैठक घेऊन दिल्‍लीकरांना दररोज 666 लिटर पाणी फुकट देण्‍याचा निर्णय जाहीर केला आहे. मुख्‍यमंत्रीपदावर विराजमान झाल्‍यानंतर त्‍यांनी जाहीर केलेला हा पहिला निर्णय आहे. या निर्णयाने केजरीवाल यांनी दिल्‍लीकरांना नववर्षाची भेट दिली आहे. शिवाय जाहीरनाम्यातील पहिले आश्‍वासन पूर्ण केले आहे. इतर आश्‍वासने पूर्ण करण्‍यात मोठ्या अडचणी आहेत.

वीजदरात 50 टक्‍के कपात करण्‍याचेही आश्‍वासन केजरीवाल यांनी दिले होते. परंतु, सरकारला वीजदर निश्चित करण्‍याचा अधिकार नसल्‍याचे वीज नियामक प्राधिकरणाने स्‍पष्‍ट केले आहे. यावर सरकारसमोर एकच पर्याय आहे, तो म्‍हणजे अनुदानाचा. सरकार अनुदान जाहीर करु शकते.

केजरीवाल यांच्‍याकडे प्रत्‍येक दिल्‍लीकर कोणत्‍या ना कोणत्‍या अपेक्षेने येत आहे. होमगार्ड, परिवहन इत्‍यादी विभागातील कर्मचा-यांनी त्‍यांच्‍याकडे मागण्‍यांचे निवेदन दिले आहे. तसेच सीएनजीचे दर वाढविल्‍यावरुन ऑटोरिक्षाचालकही नाराज आहेत. दर कमी करण्‍यासाठभ्‍ त्‍यांचा केजरीवाल यांच्‍यावर दबाव वाढत आहे.

.

केजरीवाल यांनी मागितले 10 दिवस... वाचा पुढे...