आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Invited For Lalkrishna Advanis 50th Wedding Anniversary

अडवाणी साजरा करणार लग्नाचा 50वा वाढदिवस, ग्रँड पार्टीसाठी केजरीवालांना पाठवले निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी लवकरच त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस (गोल्डन ज्यूबली) साजरा करणार आहेत. यावेळी ते मोठे आयोजन करण्याच्या तयारीत असून या सोहळ्यासाठी आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील निमंत्रित करणार आहेत. त्यासाठी अडवाणींनी त्यांना वैयक्तिक निमंत्रण पाठवले आहे.
भाजपचे लोहपुरुष संबोधले जाणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा 25 फेब्रुवारी 1965 रोजी कमला यांच्यासोबत विवाह झाला होता. येत्या 25 फेब्रुवारीला त्यांच्या लग्नाला 50 वर्षे होत आहेत. यानिमीत्त 22 फेब्रुवारी रोजी त्यांनी दिल्लीतील निवासस्थानी एका सोहळ्याचे आयोजन केले आहे. यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. दिल्लीत भाजपचा दारुण पराभव करणारे अरविंद केजरीवाल देखील या सोहळ्याचे पाहूणे असणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, केजीरवाल यांनी दिल्ली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही दिवसांनीच अडवाणींचे निमंत्रण मिळाले. आम आदमी पार्टीच्या एका नेत्याला या संबंधी विचारणा केली असता ते म्हणाले, की 'आप'चे संयोजक केजरीवाल आता दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. आता त्यांना प्रोटोकॉल प्रमाणे वागावे लागते. जर त्यांना वैयक्तिक कुठले निमंत्रण असेल तर त्याबद्दल त्यांनी पक्षाला सांगितलेच पाहिजे असे काही बंधन नाही.
गेल्या महिन्यात अडवाणींनी लोहडी उत्सव साजरा केला होता. त्यासाठी त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांना निमंत्रण दिले होते. मात्र कोणीच आले नाही. आताही त्यांनी त्या सर्वांना पुन्हा निमंत्रण पाठवले आहे. त्यामुळे आता त्यांच्या या सोहळ्यात भाजपचे किती नेते उपस्थित राहातात हे पाहाणे औत्सूक्याचे ठरणार आहे.
भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, अडवाणींनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस नेत्यांसह अनेक पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे.