आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आप'चे नेते ड्रामेबाज- माजी मुख्‍य सचिवांची टीका, केजरीवालांसाठी वडीलांकडून पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्‍लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांनी रविवारीही जनता दरबार घेतला. कौशंबी येथील निवासस्‍थानी त्‍यांनी जनता दरबार आयोजित केला होता. मुख्‍यमंत्रीपदावर विराजमान झाल्‍यानंतरचा हा पहिला जनता दरबार होता. पहिल्‍याच दिवशी त्‍यांना निदर्शनांना तोंड द्यावे लागले. काही जणांनी त्‍यांच्‍याविरोधात निदर्शने केली. तर, काही जणांनी पुष्‍पगुच्‍छ देऊन त्‍यांचे अभिनंदनही केले. केजरवाल यांच्‍या वडीलांनी रविवारी त्‍यांच्‍यासाठी होम आणि पुजेचे आयोजन केले होते.

जनता दरबारात दिल्‍ली परिवहन मंडळाचे एक शिष्‍टमंडळ केजरीवाल यांच्‍या भेटीसाठी गेले होते. याशिवाय विविध कार्यालयातील 250 कर्मचारीही जनता दरबारात पोहोचले होते. परिवहन मंडळातील अस्‍थायी कर्मचा-यांनी तत्‍काळ दिलासा देण्‍याची मागणी केजरीवाल यांच्‍याकडे केली. डीटीसीच्‍या बसेसमध्‍ये चालक आणि वाहक पदांवर अस्‍थायी स्‍वरुपात कामावर असलेल्‍या कर्मचा-यांनी नोकरीत कायम करण्‍याची केजरीवाल यांच्‍याकडे मागणी केली आहे. केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीच्‍या जाहीरनाम्‍यात दिल्‍ली सरकारमध्‍ये अनेक वर्षांपासून अस्‍थायी स्‍वरुपात कामावर असलेल्‍यांना कायम करणचे आश्‍वासन दिले होते. त्‍याचेच स्‍मरण या कर्मचा-यांनी करुन दिले.

अरविंद केजरीवाल आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी सरकारी बंगले, लाल दिव्‍याची गाडी, सुरक्षा तसेच इतर सुविधा घेण्‍याचे नाकारले. यावरुन केजरीवाल आणि त्‍यांच्‍या टीमने साधेपणाचे दर्शन घडवून एक आदर्श घालून दिला आहे. परंतु, त्‍यावर टीकाही होत आहे. दिल्‍लीचे माजी मुख्‍य सचिव उमेश सेहगल यांनी टीम केजरीवालला नाटकी म्‍हटले आहे. टीका करताना ते म्‍हणाले, की लाल दिवा आणि सुरक्षा नाकारुन थोडे नाटक केले. परंतु, 'आप'ची इतर कृती इतरांपेक्षा वेळी नाही. केजरीवाल यांनी 9 अधिका-यांची बदली केली. त्‍यावर टीका करताना सेहगल म्‍हणाले, सत्तेवर आल्‍यानंतर सरकारकडून काही अधिका-यांची बदली होते. केजरीवाल यांनी स्‍वीय सहायक बदलले. परंतु, जलसंपदा मंडळाच्‍या संचालकांना का बदलण्‍यात आले, असा सवाल त्‍यांनी केला.

यंत्रणा उभारण्‍यासाठी 10 दिवसांचा अवधी द्या.... वाचा पुढे...