आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Kn Govindacharya Rss Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RSS शी संबंधित संस्थांशी केजरीवालांचे होते संबंध -संघ नेते गोविंदाचार्यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून अडचणीत सापडलेल्या राष्टीय स्वयंसेवक संघ ( आरएसएस)चे प्रचारक के. एन. गोविंदाचार्य यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आम आदमी पक्षाच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. गोविदाचार्य यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की केजरीवाल यांचे संघाशी संबंधित अनेक संस्थांशी संबंध राहिला आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे, की आम आदमी पक्षाला संघाचा आशीर्वाद आहे.
काँग्रेस कायमच आम आदमी पक्षावर आरोप करीत आली आहे, की केजरीवाल आणि भाजप यांच्यात सेटिंग आहे. मात्र भाजप किंवा आरएसएसशी थेट संबंधित व्यक्तींने प्रथमच असे जाहीर वक्तव्य केल्याने आप अडचणीत येण्याची शक्यता आहे.
1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर भाजपने गोविंदचार्यांना पक्षातून काढले होते. मात्र आरएसएसशी आजही त्यांचा संबंध कायम आहे. गोविंदाचार्यांनी म्हटले आहे, की भ्रष्टाचाराबाबत विविध पक्षांची लढाई म्हणजे फिक्स्ड मॅचप्रमाणेच आहे. यासाठीच भ्रष्टाचार संपविण्यासाठी आपण आपच्या मोहिमेला संपूर्ण पाठिंबा देत आहोत.
गोविंदाचार्य आणि केजरीवाल यांचे संबंध जुनेच आहेत. 27 फेब्रुवारी 2011 रोजी रामलीला मैदानात सुब्रमण्यम स्वामी आणि बाबा रामदेव यांच्यासोबत अण्णा- केजरीवालांच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. इंडिया अगेंस्ट करप्शनची स्थापना झाल्यानंतर 1 एप्रिल 2011 रोजी गोविंदचार्यांना याचे संयोजक बनविण्यात आले होते. तेव्हाही केजरीवाल तेथे उपस्थित होते. 6 जुलै 2011 रोजी केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत गोविंदाचार्यांशी सल्लामसलत केली होती.
पुढे वाचा, गोविंदाचार्यांचे आरोप आपने फेटाळले...