आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Latest News Kejriwal Biggest Challenges As A Chief Minister

‘आप’सात मतभेद, मंत्रिपद न मिळाल्यामुळे विनोदकुमार बिन्नी रुसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/गाझियाबाद - पहिल्यावाहिल्या सत्तारोहणाचा सर्व जामानिमा सज्ज झाला असताना आम आदमी पार्टीत मतभेद उफाळून आल्याचे चित्र आहे. मंत्रिपदांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी अरविंद केजरीवाल यांच्या घरी पक्षाची बैठक सुरू होती. मात्र, ऐनवेळी आपले नाव वगळले गेल्यामुळे नाराज आमदार विनोदकुमार बिन्नी हे बैठकीतून तावातावाने बाहेर पडले. जाता जाता माध्यमांना ते म्हणाले, आज काहीच सांगणार नाही, जे काही सांगायचे आहे ते उद्याच सांगेन.
काँग्रेस सरकारमधील आरोग्यमंत्री ए.के. वालिया यांना पराभूत करणारे विनोदकुमार बिन्नी यांना ‘आप’च्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची मोठी आशा होती. मात्र, ती निष्फळ ठरल्याने त्यांनी बाहेरचा रस्ता धरला. इतकेच नव्हे, तर त्यांनी केजरीवाल यांच्या घराबाहेर थांबलेल्या माध्यमांकडे एका वाक्यातच प्रतिक्रिया दिली. म्हणाले, उद्या बुधवारी पत्रपरिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करू. आपमधील सूत्रांनी सांगितले की, मादीपूरचे आमदार गिरीश सोनी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने बिन्नी यांचे नाव वगळले आहे.
दरम्यान, बिन्नी यांना विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर ‘आप’कडून दिली जाऊ शकते, असे वृत्त आहे.

पुढील स्लाइडमध्ये, अण्णा हजारे का जाणार नाही शपथविधी सोहळ्याला