आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Voters Given Favor To AAP Leader Arvind Kejriwal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचा अश्वमेध केजरी रोखणार? या कारणांमुळे \'आप\' ठरेल सर्वांचा \'बाप\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम आदमी पक्षाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळण्याची शक्यता आहे, असे एबीपी न्यूज-नीलसनने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. सर्वेक्षण म्हणजे काही अंतिम निकाल नसले तरी भाजपसाठी ही माहिती डोळे उघडणारी ठरणार आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वृत्तपत्रानेही भाजपवर टीका करीत पराभव टाळण्यासाठी किरण बेदींना एन्ट्री देण्यात आल्याचे सांगितले आहे. यावरून दिल्लीत आपली घसरण होत असल्याची कुणकुण भाजपला आधीच लागली होती, असे दिसून येते. पण असे असेल तर काही महिन्यांपूर्वी फ्लॉप सुपरहिरो ठरविण्यात आलेले केजरीवाल अचानक पुढे कसे काय आले... जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास कसा काय बसला... त्यांना पुन्हा सत्ता देण्याइतपत ते लोकप्रिय कसे काय ठरले... या सगळ्याच बाबी प्रश्नांत टाकणाऱ्या आहेत. याचा आम्ही घेतलेला आढावा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा सपशेल पराभव केला होता. यापूर्वी केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. एवढेच नव्हे तर खुद्द केजरीवाल यांनीही सत्ता सोडायला नको होती, असे कबुल केले होते. लोकसभा निवडणुकीत तर केजरीवाल यांना दिल्लीत एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. पण त्यांनी पराभव स्वीकारला नाही. काम करीत राहिले. याचे फळ त्यांना आता दिल्लीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मिळत आहे.
दुसरीकडे, डॉ. हर्षवर्धन केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यानंतर दिल्लीत भाजपला चेहरा नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा उंचावल्या. आपल्यालाही संधी मिळू शकते असे त्यांना वाटू लागले. दिल्ली निवडणुकीत खरी स्पर्धा आम आदमी पक्षाशी असल्याची जाणिव भाजप नेतृत्वाला होती. त्यामुळे कोणता तरी चेहरा पुढे करणे आवश्यक होते. पण प्रभावी नेतृत्व सापडत नसल्याने वरिष्ठ नेत्यांची गोची होत होती. अशा वेळी किरण बेदी नावाचा ऑप्शन पुढे आला. पण त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. भाजपमधील असंतुष्टांची संख्या वाढलेली आहे. त्यांचा किरण बेदी यांच्या नावाला आधीच विरोध होता. आता त्यांनी अंतर्गत कुरघोडी करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे भाजपला आपशी नव्हे तर पक्षातील असंतुष्ट नेत्यांसोबतच लढत द्यावी लागत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपची अशी फजिती झाली आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, अशा प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी गरीब आणि मध्यम वर्गाशी जुळलेली नाळ तुटू दिली नाही... भाजप ठरला अपयशी...