आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Likely To Pass Janlokpal Bill In February

फेब्रुवारीमध्ये विशेष सत्रात मंजूर होईल जनलोकपाल, केजरीवाल यांचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी फेब्रुवारीमध्ये विशेष सत्र बोलावून जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे. दिल्लीला देशातील पहिले भ्रष्टाचारमुक्त राज्य करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
दिल्ली राज्य सरकारच्या वतीने आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले, 'दिल्लीत 'आप'चे सरकार आल्यानंतर 20 ते 30 टक्के भ्रष्टाचार कमी झाला आहे. आता दिल्लीतील चहा टपरी धारक आणि ऑटो चालकांकडून पोलिस लाच घेत नाहीत.'
पोलिसांनी लाच घेणे बंद केले
केजरीवाल म्हणाले, 'गेल्या पंधरा दिवासांमध्ये ऑटो चालकांकडून पोलिसांनी लाच घेतलेली नाही.' ते म्हणाले, 'माझा मित्र ऑटोने प्रवास करत असताना त्याने ऑटो चालकाशी बातचीत केली, त्यात ही माहिती मिळाली आहे. ऑटो चालकाने सांगितेल, आता 'आमचे सरकार' आहे त्यामुळे पोलिस आमच्याकडून लाच घेत नाहीत.'
चहा टपरी धारकाचा अनुभव सांगतान केजरीवाल म्हणाले, 'माझ्या एका मित्राने सांगितले, गेल्या काही दिवसांत चहावाल्याने चहाचा दर 8 रुपयांवरुन 6 रुपये केला. त्याला विचारले असे का केले तर, तो म्हणाला, आता पोलिस आमच्याकडून हप्ता घेत नाहीत त्यामुळे चहाचा दर कमी केला आहे.'

पुढील स्लाइडमध्ये, अशी असेल समिती