आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार्‍या केजरीवालांना प्रपोज करायला लागले होते चक्क 2 वर्षे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्या दिवसांमध्ये सगळीकडे केवळ अभ्यास दिसत होता. काही करून दाखविण्याची जिद्द होती. दिवसातील आठ ते दहा तास केवळ अभ्यास होत होता. इतर वेळ आराम आणि कुटुंबाला दिला जात होता. आणखी काही करण्यासाठी जराही वेळ नव्हता. परंतु, जर आयुष्यात काही अनपेक्षित घडामोडी घडणार असतील तर त्याला कुणी कसे काय बदलू शकतात. असेच झाले या जोडप्यासोबत. त्यामुळे सगळे हेच म्हणतात, की दोघेही एकमेकांसाठीच तयार झाले आहेत. केवळ एकदा दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या होत्या... अगदी प्रेमाने...

भारतीय प्रशासकीय सेवेसाठी एक मुलगा आणि एक मुलगी एकाच ठिकाणी ट्रेनिंगसाठी आले होते. यावेळी पहिल्यांदाच अभ्यासाव्यतिरिक्त कुठे नजर गेली होती. सुरवात करण्यासाठी कोणतेही कारण सापडत नव्हते. परंतु, डोळ्यांनी आपले काम चोख बजावले होते. येथून सुरू झाली एक रोमांचक प्रेम कहानी. दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचा निर्णय घेतला. होय आम्ही बोलत आहोत, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांची पत्नी सुनिता केजरीवाल यांच्याबाबत. सुनिता आयआरएसमध्ये नोकरी करतात. त्यांच्यासंदर्भात फारच कमी लोकांना माहिती आहे.

पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, अरविंद केजरीवाल यांची एक छोटीशी लव्हस्टोरी...