आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kejriwal May Invite PM To Oath Ceremony, Seeks Appointment News In Marathi

AAPला प्राप्तीकर विभागाने बजावली नोटिस; \'व्हॅलेंटाईन डे\'ला केजरींचा शपथविधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल 'व्हॅलेंटाईन डे'ला अर्थात 14 फेब्रुवारीला रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली असताना प्राप्तीकर विभागाने 'आप'ला नोटिस बजावली आहे. बनावट कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांच्या देणगी घेतल्याप्रकरणी ही नोटिस बजावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

दुसरीकडे, केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संबंध सुधारण्यासाठी कवायत आतापासूनच सुरु केली आहे. केजरीवाल गुरुवारी (12 फेब्रुवारी) नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देणार आहे. तसेच केजरीवाल यांनी एफएम रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. शपथविधी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन केले आहे.
दिल्‍लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना अन्य राज्यांच्या तुलनेत अधिकार तसे कमीच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बनल्यानंतर केजरीवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याची पावलो-पावली गरज भासणार आहे.

दरम्यान, मोदींनी मंगळवारी केजरीवाल यांना फोन करून अभिनंदन केले होते. तसेच त्यांना चहासाठी निमंत्रितही केले होते. केजरीवाल गुरुवारी मोदींची भेट घेणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नाही...