आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arvind Kejriwal News In Marathi, Aap, Delhi, India, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरविंद केजरीवाल \'रस्त्यावरून पुन्हा रस्त्यावर\'; आता लोकसभा निवडणुकीवर लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अरविंद केजरीवाल निवडणुकीच्या वळणावर पोहोचले आहेत. हा बदललेला मूड दिल्ली विधानसभा मध्यावधीपेक्षा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दिसून येतो. लोकसभा निवडणुकीसंबंधी कठोर वक्तव्य करण्याचे त्यांनी अनेक दिवस टाळले होते. परंतु शुक्रवारी त्यांची आक्रमकता दिसली. राजीनाम्यानंतर केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात जणू वाइल्ड कार्डने प्रवेश केला.

शुक्रवारी केजरीवाल आम आदमी पार्टी मुख्यालयाच्या त्याच खिडकीत दिसले. याच ठिकाणी त्यांनी पक्षाला 28 जागी विजय मिळाल्यानंतर 8 डिसेंबरला सर्मथकांना संबोधित केले होते. तेव्हा विजयोत्सव होता. केजरीवाल म्हणाले, आम्ही आंदोलन रस्त्यावर देखील करू आणि संसदेतही. आज दिल्ली विधानसभेच्या भिंती आंदोलनाच्या क्रांतीने दणाणल्या आहेत. या क्रांतीमुळे आता संसदेच्या भिंतीपर्यंत ही क्रांती पोहचेल. आंदोलन रस्त्यावर आणि संसदेतही करू.

आई-वडिलांनाही सोबत आणले होते
शुक्रवारी सकाळी केजरीवाल आई-वडिलांसह पहिल्यांदा दिल्ली सचिवालयात दाखल झाले. त्याच वेळी हे सरकार पुढे चालेल का, असे वाटत होते.सचिवालयानंतर मुख्यमंत्र्यांचे आई-वडील विधानसभा कार्यवाहीमध्ये देखील दिसून आले. तेव्हा संशय आणखी वाढला होता. बहुधा सरकारचा शेवटचा दिवस असावा. 49 दिवसांत पहिल्यांदा केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर शपथ घेतली तेव्हा त्यांचे आई-वडील, पत्नी व मुले मैदानात सामान्य नागरिकांमध्ये बसले होते. केजरीवाल यांच्या कार्यकाळात देखील त्यांचे आई-वडील उपस्थित होते.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, संपूर्ण नाट्य...