आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arvind Kejriwal News In Marathi, AAP, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजरीवालांचा मोदींवर \'लेटरबॉम्ब\'; भ्रष्टाचार, महागाई, जातीयतेच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून त्यात भ्रष्टाचार व जातिवादच्या मुद्द्याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘लोक असे म्हणतात की मोदी चांगले बोलतात व भाषण देतात, परंतु भाजपचे नेते व मंत्री पंतप्रधानांच्या सांगण्याविरुद्ध काम करत आहेत. त्यांच्यावर मोदींचे नियंत्रण नाही. सरकारला चार महिने पूर्ण झाले आहेत. लोकांमध्ये या चार महिन्यांची खूप चर्चा आहे. त्यांच्याच त्याच भावना आपण पत्राद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छितो.’

पत्रात केजरीवालांनी मोदी सरकारवर आरोप केला आहे. चार महिन्यांच्या काळात लोकांच्या समस्या दूर झालेल्या नाहीत. भाजपने व मंत्र्यांच्या कार्यशैलीवर मोदी काहीच बोलत नाहीत किंवा कारवाईदेखील करत नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम मोदींनी दूर करावा. केजरीवाल म्हणतात, की पंतप्रधानांनी देशात १० वर्षांपर्यंत जातीयवादाचा विषय दूर ठेवण्याचे व त्याविषयी न बोलण्याचे आश्वासन देशाला दिले होते. लोकांना त्यांची ती बाब खूप आवडली होती. परंतु लोकांनी जेव्हा योगी आदित्यनाथांनी काही दिवसांपूर्वी केलेले भाषण ऐकले तेव्हा ते चकित झाले. आिददित्यनाथांनी धर्माच्या नावावर विखारी भाषण दिले. पक्षाच्या लोकांनी धर्माच्या नावावर विष कालवणे सुरू केल्याचे लोकांना आश्चर्य वाटले. भाजपचे लोक पंतप्रधानांचे आवाहन का मानत नाहीत? योगी आदित्यनाथ व पक्षाच्या नेत्यांना हे सगळे करण्यापासून तुम्ही रोखाल अशी अपेक्षा होती, परंतु तुम्ही गप्प राहिलात, असेही मोदींना उद्देशून केजरीवालांनी म्हटले आहे.
या मुद्द्यांवरही केजरीवालांचा आक्षेप
* भ्रष्टाचारविरोधी शाखा पंगू बनवली
केजरीवालांनी पत्रात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी तुमच्या गृहमंत्र्यांनी अधिसूचना जारी करून दिल्लीच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेतील अधिकारी कमी करून त्यांना पंगू बनवले. जर खरोखरच भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची इच्छाशक्ती तुमच्याकडे असेल, तर अशा शाखांना आणखी सुविधा द्यायला हव्या होत्या. प्रामाणिक अधिकारी त्या शाखेत भरती करायला हवे होते, परंतु शाखा पंगू करून भ्रष्टाचाराला वाव दिला गेला आहे. यावरही तुमचे गप्प राहणे लोकांना अचंबित करणारे वाटत आहे. एम्सचे सीईओ संजीव चतुर्वेदी यांना हटवल्याबद्दलही केजरीवालांनी नाराजी व्यक्त केली आहे.

* मंत्र्याच्या मुलाबाबत तुम्ही गप्प कसे?
पत्रात केजरीवालांनी मंत्र्याच्या मुलाने दिल्लीत पोलिसांची बदली करण्यासाठी काही लोकांकडून पैसे घेतल्याच्या आरोपाबाबतही मोदींनी चुप्पी साधल्याचे म्हटले आहे. याशिवाय पक्षाच्या दिल्ली शाखेचे उपाध्यक्ष दुस-या पक्षाच्या आमदारांना खरेदी करत असल्याच्या कथित व्हिडिओ, सीमेवरील हालचाली, कोळसा विक्रीच्या समझोत्यामुळे होणारे नुकसान याकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. महागाईसारख्या मुद्द्यावर लोकांना दिलासा न मिळाल्याचा मुद्दा विस्ताराने मांडताना म्हटले आहे की, पोटनिवडणुकीचे निकाल पाहता लोकांचा विश्वास हळूहळू कमी होत असल्याचे दिसत आहे.