आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal News In Marathi, AAP, Gujarat, BJP, Lok Sabha Election

केजरीवाल यांना गुजरातमध्ये रोखले आणि अर्ध्‍या तासाने सोडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केजरीवाल यांना गुजरातमध्ये ताब्यात घेताच आप कार्यकर्ते दिल्लीतील भाजप मुख्यालयावर चालून गेले. - Divya Marathi
केजरीवाल यांना गुजरातमध्ये ताब्यात घेताच आप कार्यकर्ते दिल्लीतील भाजप मुख्यालयावर चालून गेले.

अहमदाबाद/नवी दिल्ली/ लखनऊ - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच देशातील राजकीय पारा वाढला आहे.आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे गुजरात दौ-यावर असून बुधवारी त्यांनी रोड शो केला. त्या वेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. अर्ध्या तासानंतर सोडण्यातही आले. परंतु केजरीवाल यांना ताब्यात घेतल्याचे कळताच संतप्त आप कार्यकर्त्यांनी दिल्ली आणि लखनऊमध्ये भाजप कार्यालयासमोर निदश्रने केली. या वेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. जोरदार धुमश्चक्री उडाली. सायंकाळी कच्छनजीक केजरीवाल यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला.
मनीष सिसोदिया, संजयसिंह आणि इतर नेत्यांसोबत केजरीवाल यांचा बुधवारपासून चार दिवसांचा गुजरात दौरा सुरू झाला. केजरीवाल म्हणाले, या दौ-यात नरेंद्र मोदींच्या गुजरात विकासाच्या दाव्यांमधील सत्य शोधण्यात येणार आहे. मोदी त्यामुळेच घाबरले असून त्यांनी पोलिसांची मदत घेतली आहे. मोदींच्या सांगण्यावरूनच चार-सहा जागी काळे झेंडे दाखवण्यात आले. मात्र आम्ही त्यांना भीक घालणार नाही.


गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेशात गोंधळ
दुपारी 2:30 - पाटण जिल्ह्यात राधनपूरमध्ये पोलिसांनी केजरीवाल यांना ताब्यात घेतले. त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले म्हणून ताब्यात घेतल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. नंतर केजरीवाल यांच्या ताफ्यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने त्यांना अडवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.अर्ध्या तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.


सायंकाळी 5:30 - पत्रकार व आपचे नेते आशुतोष यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयासमोर निदर्शने करण्यासाठी पोहोचले. या निदश्रनांना हिंसक वळण लागले. दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. अनेक लोकांची डोकी फुटली. पोलिसांनी पाण्याचे फवारे मारून गर्दीला पांगवले. 32 लोकांना ताब्यात घेण्यात आले.


सायंकाळी 7 :20 - कच्छच्या खारोकी भागात केजरीवाल यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. त्यांच्या गाडीच्या काचा फु टल्या.अनेक जण जखमी झाले.दिवसभर केजरीवाल यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना सायंकाळी हटवण्यात आले.


सायंकाळी 7:30 - लखनऊमध्ये आप कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर निदश्रने केली. भाजप कार्यकर्त्यांनी दंडुक्याच्या बळावर आप कार्यकर्त्यांना पिटाळले. पोलिसांनीही लाठीमार केला.