आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal News In Marathi, Delhi High Court Hearing In Jail

केजरीवाल अखेर वठणीवर, हायकोर्टाने फटकारल्यानंतर हमीपत्र भरण्‍यास तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यामध्ये जामीन घेण्यास नकार देणारे आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल अखेर वठणीवर आले आहेत. हायकोर्टाने चांगलेच फटकारल्यानंतर जामिनासाठी हमीपत्र भरण्यास केजरीवालांनी तयारी दर्शवली असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते आणि वकील प्रशांत भूषण यांनी याबाबत हाईकोर्टात सांगितले. केजरीवाल गेल्या 21 मेपासून तुरुंगात आहेत.

केजरीवाल यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु तेथेही केजरीवाल यांची डाळ शिजली नाही. केजरीवाल यांनी हमीपत्र भरावेच लागेल, असा सल्ला दिल्ली हायकोर्टाने आज (मंगळवार) झालेल्या सुनावणीत दिला. विशेष म्हणजे हमीपत्र भरण्यासाठी केजरीवाल यांनी दुपारी एक वाजेपर्यंत वेळ दिला होता. केजरीवाल यांनी जामिनाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करु नये, अशा शब्दात कोर्टाने केजरीवाल यांना फटकारले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर निर्णयांविषयीचे कायदेशीर मुद्दे केजरीवाल उपस्थित करू शकतात; असे कोर्टाने सांगितले.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यामध्ये जामीन घेण्यास केजरीवाल यांनी स्पष्ट नकार दिला होता. मात्र, नंतर केजरीवाल यांचीच कोंडी झाली. केजरीवाल दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. परंतु दुसर्‍या सुनावणीतही केजरीवाल आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने त्यांना 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याविरोधात केजरीवाल यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, केजरीवालांचा ड्रामा नाही : पत्नीचा दावा