आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आम आदमी" प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तींच्या शोधात; शपथविधीचे सर्वांना निमंत्रण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम्हाला प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तींची गरज आहे. अशा व्यक्तींना शोधण्यासाठी आम्ही एक टीम तयार केली आहे. एखादे सरकार चांगल्या लोकांच्या शोधात असल्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे, असे आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.
अरविंद केजरीवाल शनिवारी दुपारी रामलिला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यासाठी सर्वांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासंदर्भात आज (गुरुवार) सकाळी बोलताना केजरीवाल म्हणाले, की आमचे सरकार प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तींच्या शोधात आहे. अशाच व्यक्तींना वरिष्ठ पदे दिली जातील.
आज सकाळी केजरीवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बरेच तणावमुक्त दिसत होते. पत्रकारांसोबत बोलताना स्मितहास्य झळकाविणारे केजरीवाल प्रांजळपणे म्हणाले, की राजकीय घडामोडींमुळे मला सकाळी फिरायलाही जाता आले नाही.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, न्यायाधीश संतोष हेगडे यांच्यासह सगळ्या दिल्लीकरांना शपथविधी समारंभासाठी बोलविण्यात आले आहे, असेही केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.