आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकानपूर - देशात नरेंद्र मोदी यांची नव्हे, तर संतापाची लाट आहे. मला देशात कोणाचीच हवा दिसत नाही. हा केवळ टीव्ही वाहिन्यांनी केलेला भ्रम आहे. वाहिन्या पैसे घेऊन सर्वेक्षण दाखवतात, असे वृत्त आले होत. हा तर वाहिन्यांचा बदमाशपणा आहे, असा घणाघात आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी येथील सभेत रविवारी केला.
आगामी लोकसभा निवडणुकीत आपच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नाही असे सांगून पक्षाला 100 जागा मिळतील असा दावा केजरीवाल यांनी केला. गॅसच्या किमती वाढणार असल्यामुळे एक एप्रिलपासून सर्वकाही महाग होईल. पंतप्रधान झाल्यावर तुम्ही अंबानी यांना एका डॉलरच्या गॅससाठी दोन डॉलर देणार की आठ, अशी विचारणा मोदींना केली होती. त्यांच्याकडून अद्याप उत्तर आले मोदी एकाएका सभेसाठी 50-50 कोटी रुपये खर्च करतात, अशी माहिती आहे. मोदी मुकेश अंबानी यांचे विमान, हेलिकॉप्टर वापरत आहेत. चहा विकणाºयाकडे एवढी हेलिकॉप्टर्स आले कोठून? असा सवाल त्यांनी केला. 5 ते 8 मार्च दरम्यान केजरीवाल गुजरात दौºयावर जाणार आहेत.
मोदींना वाराणसीतून केजरीवाल यांचे आव्हान ?
नरेंद्र मोदी वाराणसी येथून निवडणूक लढवणार असतील तर अरविंद केजरीवाल त्यांना आव्हान देऊ शकतात. आपचे नेते संजय सिंह यांनी आपल्या भाषणात हे आवाहन केले. आप नेते मनीष शिसोदिया म्हणाले, अंबानींबाबत केजरीवाल यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर वाराणसीच्या लोकांनी उत्तर द्यावे. वाराणसीमध्ये केजरीवाल मोदींना हा प्रश्न विचारतील.
ऑटो चालकांचा केजरीवाल यांना पाठिंबा नाही
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा मोफत प्रचार करणारे ऑटो चालक या वेळी केजरीवाल यांना पाठिंबा देणार नाहीत. दिल्ली ऑटो रिक्षा यूनियनचे सरचिटणीस राजेंद्र सोनी म्हणाले, केजरीवाल यांनी सभेत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. वाहतूक विभाग आणि पोलिस छोट्या-छोट्या प्रकरणात रिक्षा जप्त करणार नसल्याचे त्यांनी गेल्या महिन्यात जाहीर केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.