आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रामाणिक राजकारणाची सुरुवात, देशातील भ्रष्टाचार आणि महागाई संपवणार - केजरीवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आता पर्यंत देशातील राजकारण भाजप - काँग्रेस आणि काही मोजक्या पक्षांच्या धार्मिक आणि जातीय राजकारणाभोवतीच फिरत होते. महागाई आणि बेरोजगारीने लोकांना जगणे कठीण झाले होते. येणा-या दिवसांमध्ये जनता या पक्षांना धडा शिकवल्या शिवाय राहाणार नाही, असा दावा आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली विधानसभेवर मोठ्या मताधिक्याने निवडूण आलेले अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी दिल्लीकरांना धन्यवाद दिले आणि 'आप' आता देशभर अशाच पद्धतीने लढा उभारणार असल्याचे म्हटले आहे.

केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

आम्ही कोण आहोत. सर्वसामान्य लोक आहोत. हा विजय आमचा नाही तर जनतेचा विजय आहे.

वीस कोटी रुपये आमचे निवडणूकीचे बजट होते आणि ते पूर्ण झाल्यानंतर देणगी घेणे आम्ही बंद केले.

प्रामाणिक लोक राजकारणात येऊ शकतात आणि निवडणुकीत जिंकू देखील शकतात, हे आम्ही दाखवून दिले आहे.

विजयी उमेदवारांनी तन-मन-धनाने जनतेची सेवा करावी.

भाजप आणि डॉ. हर्षवर्धन यांना विजयाच्या शुभेच्छा. शीला दीक्षित यांच्याशी आमचे कोणतेही वैयक्तिक भांडण नाही. आमची लढाई भ्रष्टाचार आणि महागाई विरोधात आहे.

देशभरातून दिल्लीत आलेल्या प्रचारकांचे आणि स्वयंसेवकांचे आभार. त्यांच्या कुटुंबियांना या काळात झालेल्या त्रासाबद्दल माफी मागत त्यांनाही धन्यवाद दिले.

कोणालाही समर्थन मागणार नाही. विरोधी बाकांवर बसायला तयार