(फाइल फोटो: अरविंद केजरीवाल यांच्यासोबत किरण बेदी)
नवी दिल्ली- आम आदमी पक्षाचे (
आप) राष्ट्रीय संयोजक
अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. ती म्हणजे, दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सोडायला नको होते. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, ही सगळ्यात मोठी चूक ठरली.
केजरीवाल यांनी पुन्हा एकदा आपली चूक कबूल केली आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
'आपण मनुष्य आहोत. आपल्या हातून चुका या होतच असता, असेही केजरीवाल यांनी सांगितले. तसेच केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची रणनीतीविषयी यावेळी माहिती दिली. 'आप' मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीपूर्वीच घोषित करेल. तसेच या संदर्भात अंतिम निर्णय पक्षातील सदस्य घेतील, असेही स्पष्ट केले.
केजरीवाल म्हणाले की, पक्षाने किरण बेदी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा ऑफर दिली होती. तब्बल पाच वेळा मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊनही किरण बेदी यांनी ती फेटाळली होती, हे सांगायला केजरीवाल विसरले नाहीत.
केजरीवाल म्हणाले, 'आप'चे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. पक्षातील काहीही मला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे निर्णय चुकत गेल्याचे केजरीवाल यांनी म्हटले. पंतप्रधान
नरेंद्र मोदी अथवा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच रॉबर्ट वढेरा यांच्यावर कधीच वैयक्तीक टीका केली नाही. मात्र, नरेंद्र मोदी हे दिल्ली मुख्यमंत्री नाहीत हे दिल्लीतील जनतेने समजून घ्यायला हवे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.