आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal On Strike Against Sushil Kumar Shinde

अरविंद केजरीवाल यांच्या दोन मागण्या मान्य, धरणे आंदोलन मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली पोलिस अधिकार्‍यांच्या निलंबानासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन आज रात्री साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान मागे घेण्यात आले आहे. त्याआधी प्रेस क्लबमध्ये आपच्या नेत्यांची आपातकालिन बैठक झाली. ही बैठक संपून परतलेले केजरीवाल यांनी दोन मागण्या मान्य झाल्याचे सांगत धरणे आंदोलन मागे घेतले आहे. जवळपास पावणे सहा वाजताच्या दरम्यान ते रेल्वे भवन जवळून प्रेस क्लबमध्ये बैठकीसाठी गेले होते. तिथे आपचे नेते योगेंद्र यादव, दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. ते म्हणाले, पहाडगंज आणि मालवीय नगर येथील पोलिस निरिक्षकांना सक्तीच्या सुटीवर पाठवण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिन आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केलेले अपिलही लक्ष्यात घेण्यात आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आंदोलन दुसर्‍याच दिवशी हिंसक झाले. पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर हिंसक आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. रफी मार्गावरही उग्र आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. दुसरीकडे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदरसिंग लव्हली यांनी केजरीवाल यांना खोटारडे म्हटले आहे. त्यांनी आम आदमी पक्षाला इशारा देताना म्हटले आहे, की 'आप' जबाबदारी झटक आहे. ते जबाबदारीपासून असेच पळ काढत राहिले तर काँग्रेस समर्थन मागे घेऊ शकते.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे धरणे आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरु आहे. आज (मंगळवार) पुन्हा एकदा पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. रेल्वे भवनसमोर गर्दी वाढली असून जमावातून कोणीतरी पोलिसांच्या दिशेन दगड भिरकावल्यामुळे पोलिसांनी लाठीमार सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या लाठीमारानंतर आंदोलक हिंसक झाले. त्यांनी बॅरिकेटींग तोडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आपचे नेते आणि दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी जमावाला शांत केले आणि शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
गृहमंत्र्यांना सुखाने झोपू देणार नाही - केजरीवाल
सोमवारची पूर्ण रात्र केजरीवाल यांनी रस्त्यावर झोपून काढली. मंगळवारी सकाळी त्यांच्या पत्नीने त्यांच्यासाठी नाश्ता आणला होता. सोमवारी केजरीवाल यांनी, होय मी अराजक आहे. असे म्हटले होते. मंगळारी त्यांनी गृहमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पत्रकारांना चांगले म्हणत त्यांच्या मालकांना दुषणे दिली. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांवर त्यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'मला राजीनामा देण्यास सांगत आहेत. माझे त्याना उत्तर आहे, की राजकारण बदलत आहे. आता गल्लीबोळातून राजकारण केले जाईल. जनतेच्या हिताचे प्रश्नन उपस्थित करणे यालाच लोकशाही म्हणतात.'
केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयात आज उच्चस्तरीय बैठक झाली. त्याआधी आपल्या मंत्र्यांशी गैरवर्तन करणार्‍या चार पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करावे, नाहीतर त्यांची बदली तरी करावी या मागणीसाठी इरेला पेटलेले केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आज (मंगळवार) पुन्हा लक्ष्य केले. माध्यमांच्या प्रतिनिधींना केजरीवाल म्हणाले, सुशीलकुमार शिंदे यांना मी सुखाने झोपू देणार नाही. सोमवारी दुपारपासून धरणे आंदोलन करत असलेले केजरीवाल आणि त्यांचे अख्खे मंत्रिमंडळ रात्रभर रस्त्यावरच झोपले होते.
केजरीवाल म्हणाले, 'शिंदेंनी धरणे आंदोलन स्थळाजवळील मेट्रो स्टेशन्स बंद केले आहेत. ते स्वतःला दिल्लीचे मुख्यमंत्री समजत आहेत आणि दिल्लीचे पोलिस देखील त्यांना समर्थन देत आहे. शिंदे हुकूमशाह आहेत का, असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले, मुख्यमंत्री मी आहे की शिंदे. आंदोलन कुठे करायचे हे ठरविणारे शिंदे कोण आहेत.'
गृहमंत्री शिंदेवर आगपाखड करताना केजरीवाल म्हणाले, जेव्हा शिंदेच्या घराची एखादी खिडकी कोणी फोडली तर कित्येक अधिकार्‍यांना निलंबित केले जाते. मात्र, आमच्या मुलींवर बलात्कार झाला त्यांना जीवंत जाळले तरीही पोलिस निरिक्षकाला निलंबित केले जात नाही.

माध्यमांवर निशाणा
माध्यमांवर निशाणा साधताना केजरीवाल म्हणाले, काही माध्यमकर्मी काँग्रेस आणि भाजपच्या राजकारणाची शिकार झाले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, केजरीवाल यांची वादग्रस्त वक्तव्ये