आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Parents Promoting Party Candidates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Delhi Election हे आहेत केजरीवाल यांचे आई वडील, दारोदार करत आहेत प्रचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तसे पाहता निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांचे संपूर्ण नातेवाईकच मतदारांना साकडं घालण्यासाठी उतरलेले असतात. नवी दिल्ली मतदारसंघात आम आदमी पार्टीचे संयोजक केजरीवाल यांच्या प्रचारातही तसेच चित्र दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांचे वडील गोविंदराम आणि आई गीतादेवी हे आपल्या मुलाच्या प्रचारासाठी दारोदार फिरत आहेत. आपच्या इतर उमेदवारांचाही ते प्रचार करत आहेत.
फोटो - केजरीवाल यांचे वडील गोविंदराम आणि आई गीतादेवी.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उमेदवारांबरोबरच त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल यांच्या विरोधात असलेल्या नुपूर शर्मा यांच्या बरोबरच त्यांचे इतर राज्यांतून आलेले नातेवाईकही तळ ठोकून बसले आहेत. नुपूर यांचे वडील विनय शर्मा, आई रुपाली यांच्याशिवाय देहराडूनहून आलेले त्यांचे मामा, मामी हेही प्रचार करत आहेत. त्याशिवाय आगरा येथून आलेल्या नुपूर यांच्या मावशी संगिता, बिजनोरहून आलेले त्यांचे मामा अश्विनी महर्षी, मामी मृदुला आणि जयपूरची मावशी शशी हेही प्रचारात व्यस्त आहेत.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ज्येष्ठ आई वडील गोविंद राम आणि गीतादेवी हेही मुलाच्या विजयासाठी दिल्ली परिसरात जोरदार प्रचार करत आहेत. हे दोघेही सकाळी 11 वाजता घरातून बाहेर पडतात आणि रात्री 8 वाजेपर्यंत मतदारसंघात प्रचार करतात. काँग्रेसचे उमेदवार प्रा.किरण वालिया यांचा मुलगा समीर आणि सूनही प्रचारात उतरले आहेत. पण ते प्रत्यक्ष प्रचार करण्याऐवजी लॅपटॉपद्वारे प्रचार निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.