आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Protest Against Delhi Police Amis Section 144 At Home Ministry

AAP चे आरोप, मंत्री भारद्वाज पोलिसांच्या ताब्यात, आमदार त्रिपाठी यांना बेदम मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आम आदमी पार्टीच्या सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठिमारात आमदार अखिलेश त्रिपाठी जबर जखमी झाले असून त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पार्टीने सांगितले आहे. दरम्यान, मागण्यांवर निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.
दिल्ली पोलिसांच्या चार अधिका-यांच्या (एक पोलिस अधिक्षक आणि तीन पोलिस निरिक्षक) निलंबनाची मागणी करणारे अरविंद केजरीवाल रेल्वे भवन येथे एका पार्कमध्ये धरणे आंदोलन करीत आहेत. तिथे आपच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांच्या कारला घेराव घातला. त्यामुळे त्यांना पायी कार्यालयात जावे लागले आहे. त्यानंतर पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झुंबड उडाली. आंदोलनस्थळाजवळील एक गाडी बाजूला करण्याच्या वादातून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरु झाली. तेव्हा दिल्लेचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया देखील तिथेच होते. त्यानंतर पोलिसांनी धरणे आंदोलन करणा-या कार्यकर्त्यांना जंतर-मंतर येथे जाण्यास सांगितले आहे.
केजरीवाल यांचे दिल्ली पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप
केजरीवाल म्हणाले, सलग 10 दिवस आंदोलन करण्याच्या तयारीने आलो आहे. त्यावर गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, केजरीवाल मुख्यमंत्रीपदावरील व्यक्ती आहेत. त्यांना समजायला हवे, की नायब राज्यपाल नजीब जंग यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी थोडी वाट पाहून संयम बाळगायला हवा.
आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांचे धरणे आंदोलन योग्य असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आंदोलन सुरु केल्यानंतर यादव यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच कायदा सुव्यवस्था दिल्ली सरकारच्या अधिकार कक्षेत देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, मालवीय नगरच्या खिडकी एक्सस्टेंशन भागातील नागरिकांनी त्यांचे आमदार आणि दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर भारती यांनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले होत. मात्र पोलिस भ्रष्ट निघाले. पोलिसांनी कारवाई करण्याचे टाळले. केजरीवाल जे काही करीत आहेत ते आपच्या घोषणापत्रानुसारच आहे. कायदा मंत्री भारती यांच्यावरील आरोपही त्यांनी फेटाळले आहेत.
चार स्टेशन दुपारपर्यंत बंद
गृहमंत्र्यांच्या कार्यालयासमोर केजरीवालांचे आंदोलन होणार असल्यामुळे मोठ्या संख्येने लोक जमा होण्याची शक्यता लक्षात घेऊन नॉर्थब्लॉककडे येणा-या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. येथे बॅरिकेड्स लावण्यात आल्या असून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तसेच चार मेट्रो स्टेशन- पटेल चौक, केंद्रीय सचिवालय, उद्योग भवन आणि रेसकोर्स बंद ठेवण्यात आले आहेत. केंदीय सचिवालय स्टेशनवर मर्यादित संख्येत प्रवाशांना प्रवेश देण्याचे मेट्रो प्रशासनाने ठरविले आहे. मात्र त्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
सीआयएसएफला सर्व स्टेशन्सवर कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या स्टेशनवर अतिरिक्त सुरक्षाकर्मचारी तैनात केले गेले आहेत. तसेच क्यूआरटी (क्विक रिएक्शन टीम) आणि कमांडो पथकही राखिव ठेवण्यात आले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, केजरीवाल यांच्या आंदोलनावर सोशल मीडियातून टीका