आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल यांना पर्यायच नव्हता, सोमवारी सायंकाळी \'पीएमओ\'त ठरला होता फॉर्मूला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घेण्याच्या नायब राज्यपालांच्या आवाहनावरून दिल्लीतील सरकारने आपले धरणे आंदोलन मागे घेतले. त्याआधीच पंतप्रधान कार्यालयात आंदोलन मागे घेण्याचा फॉर्मूला तयार झाला होता.
केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनाला सोमवारी सकाळी प्रारंभ झाल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत अधिका-यांना सुटीवर पाठवण्याचा फार्मूला तयार केला गेला, त्याबरोबरच केंद्र प्रत्यक्ष या प्रकरणात दखल देणार नसल्याचेही ठरले. मंगळवारी रेल्वे भवनसमोरील वातावरण तापत असतानाच दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांना धरणे आंदोलनाचा निपटारा लावण्याचे निर्देश देण्यात आले. यात प्रजासत्ताक दिनाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी केंद्र कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. 23 जानेवारी रोजी फुल ड्रेस रिहर्सल होते त्याआधी हा भाग लष्कराच्या ताब्यात देण्यात येतो, या गोष्टीची केंद्र सरकारला विशेष चिंता होती.

पुढील स्लाइडमध्ये, सरकारच वरचढ, केजरीवालांचे नमते