आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Send To Judicial Custody, AAP Supporters Protest Outside Tihar Jail

अरविंद केजरीवालांच्या मूल्यांची ऐशी-तैशी, योगेंद्र यादवांनी सुटकेसाठी बाँड भरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जामीन घेण्यास नैतिकतेच्या आधारावर नाकार दिला होता. पण त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या नीतीमूल्यांची ऐशी की तैशी केली आहे. योगेंद्र यादव यांनी गुरुवारी केजरीवाल यांच्या सुटकेसाठी पाच हजारांचा बाँड भरला. त्याआधी मनीष सिसोदीया आणि जरनैल सिंह यांनीही असाच बॉंड भरला होता. त्यानंतर त्यांची सुटका झाली होती.
दरम्यान, त्याआधी सकाळी आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकणे अन्यायकारक असल्याचे सांगत आप नेते संजयसिंह यांनी याबद्दल जनतेत जाऊन जागरुकता आणि सत्यता मांडणार असल्याचे सांगितले आहे. नितीन गडकरींविरोधातील भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा करुन जनतेत पत्रके वाटली जातील. आज (गुरुवार) सकाळी तिहार तुरुंगात केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतान ते म्हणाले, 'नरेंद्र मोदींनी केजरीवालांना पाकिस्तानचा एजंट म्हटले होते. त्यांच्याकडे याबद्दलचे पुरावे आहेत का?' आंदोलकांकडून जामीन नाकारण्याची आणि जातमुचलका न भरण्याची ही काही पहिली घटना नाही. मात्र, यासाठी तुरुंगात पाठवण्याची ही पहिली वेळ आहे.

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यात तिहार तुरुंगात पाठवण्यात आलेले आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल बुधवारी रात्री उपाशी राहिले. केजरीवाल यांनी उशिरा रात्रीपर्यंत जेवण केले नसल्याचे कळते. त्यांच्या अशा वागण्यामुळे तुरुंग प्रशासनाला केजरीवाल तुरुंगात उपोषण तर करत नाही ना, अशी शंका आली. आज सकाळी मात्र, तुरुंग अधिका-यांनी केजरीवाल यांनी उशिरा रात्री जेवण केल्याचे सांगितले. केजरीवाल यांच्या तुरुंगवारीला दिल्ली विधानसभा जिंकण्यासाठीची स्टंटबाजी म्हणून पाहिले जात आहे.

आज (गुरुवार) सकाळी सव्वा नऊ वाजता आपचे नेते संजयसिंह केजरीवालांना भेटण्यासाठी तिहार तुरुंगात गेले. त्यांच्यानंतर केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता आणि पक्षाचे नेते प्रशांत भुषण देखील भेटी साठी येऊ शकतात. आपचे कार्यकर्ते आज भाजपच्या कार्यालयासमोर निदर्शने करु शकतात. केजरीवालांची अटक हे भाजपचे षडयंत्र मानले जात आहे.
दुसरीकडे, काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी ट्विट करुन म्हटले आहे, की केजरीवाल यांनी 'नौटंकी'करण्यापेक्षा माझ्यासोबत आले पाहिजे. कारण गडकरींनी माझ्याविरोधातही खटला दाखल केला आहे.

आप हायकोर्टात जाण्याची शक्यता
10 हजारांचा जातमुचलका न भरल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना पतियाळा कोर्टाने दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याविरोधात आम आदमी पार्टी (आप) हायकोर्टाचे दार ठोठावण्याची शक्यता आहे. गुरुवारी, केजरीवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि तिहार तुरुंगात नेले. यानंतर तुरुंगाबाहेर आप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडला होता. यामुळे आज येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, तिहार तुरुंग परिसरात कलम144 लागू करण्यात आले आहे. येथे जर लोक गटा-गटाने जमा झाले आणि त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले तर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

विरोधक आणि विश्लेषकांकडून टीकेची झोड
अब्रूनुकासानीच्या प्रकरणात जामीन नाकारुन अरविंद केजरीवाल विरोधक आणि राजकीय विश्लेषकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत आपला अपेक्षीत यश मिळाले नाही. त्यामुळे दिल्ली विधानसभेत पुन्हा एकदा निशब आजमावण्यासाठी केजरीवाल यांनी हे राजकीय नाट्य उभे केले असल्याची टीका विश्लेषकांनी केली आहे. त्यांचे जुने आणि ज्येष्ठ सहकारी अण्णा हजारे यांनी देखील केजरीवाल यांच्या डोक्यात पंतप्रधानपदाची हवा गेल्याचा टोला लगावला आहे. काँग्रेसने केजरीवाल यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बुधवारचा 'ड्रामा' छायाचित्रांमध्ये....