आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Slapped Again While Campaigning In Delhi

केजरीवाल यांनी घेतली थप्पड मारणाऱ्याची भेट, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी आज (बुधवार) थप्पड मारणाऱ्या ऑटोरिक्षा चालकाची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी या चालकाने त्यांची माफी मागितल्याचे समजते.
केजरीवाल यांना मंगळवारी एका रिक्षाचालकाने चापट लगावली. राखी बिडलान यांच्या प्रचारार्थ आयोजित रोड शोदरम्यान हा प्रकार घडला. हा ताफा सुलतानपुरीजवळ पोहोचताच एका ऑटोरिक्षाचालकाने जीप थांबवून केजरींना हार घातला आणि नंतर जोरात चापट लगावली.
दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि वाराणसीमध्ये गेल्या महिनाभरात केजरीवाल यांच्यावर झालेला हा पाचवा हल्ला आहे. यात केजरीवाल यांचा डावा गाल व डोळा सुजला आहे. केजरी समर्थकांनी ऑटोचालकाला पकडून जोरदार चोप दिला व नंतर पोलिसांच्या हवाली केले.
मास्टरमाइंड कोण?
वारंवार होणार्‍या या हल्ल्यामागे नेमका सूत्रधार आहे तरी कोण? त्याला हवे आहे काय? हिंसाचाराने प्रश्न सुटणार असतील तर मला ठिकाण सांगा, मी तिथे येतो, असे केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. या प्रकारानंतर केजरीवाल राजघाटावर बापूंच्या समाधीसमोर बसले. तासभर मौन पाळून नंतर म्हणाले, आगामी काळात आणखी हल्ले होतील. कदाचित जीव गमवावा लागेल; परंतु मी डगमगणार नाही.
संतापाने लाली लाल!
पोलिसांनुसार, केजरींना चापट लगावणार्‍याचे नाव लाली आहे. केजरीवाल यांनी धोका दिला. खोटारडेपणा केला. आम्हाला लुटले आहे. म्हणूनच त्यांना मारले, असे लाली ओरडून सांगत होता. दरम्यान, काँग्रेस व भाजपने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, केजरीवाल यांनी दिल्ली निवडणुकीत जी आश्वासने दिली ती पाळली नाहीत म्हणून लोक प्रचंड चिडलेले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेची छायाचित्रे