आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Special Interview With Divya Marathi

\'देशात मोदीलाट आहेच, हे नाकारता येणार नाही\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील राजकारणात उलथापालथ घडवणारे हे एक नाव. रातोरात त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तोंडभरून कौतुक झाले आणि कमालीचा पाठिंबाही मिळाला. यातून आकांक्षा प्रचंड वाढल्या. यातच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सोडले आणि शंकाकुशंकांसोबत अनेक प्रश्नही उपस्थित झाले. भास्कर समूहाचे नॅशनल एडिटर कल्पेश याग्निक यांनी अरविंद केजरीवाल यांना हेच प्रश्न विचारले. संपूर्ण मुलाखतीत नरेंद्र मोदींवर त्यांनी आगपाखड केली. मात्र, शेवटी आश्चर्याचा धक्का देत म्हणाले, ‘देशात मोदींची लाट आहेच, हे नाकारता येणार नाही..’ प्रत्येक मुद्दय़ाची सुरुवात आणि शेवट त्यांनी मुकेश अंबानींचा संदर्भ देतच केला..

सर्वांनाच भ्रष्ट ठरवल्याबद्दल..
भास्कर : आपली भाषा, वागणूक अशी कशी? आपल्यासोबतचे प्रामाणिक आणि विरोधात आहेत ते भ्रष्ट?
केजरीवाल : नाही. मी असे कधीच म्हटले नाही. काँग्रेस आणि भाजपमध्येही अनेक चांगले लोक आहेत. त्यांनी ते पक्ष सोडून ‘आप’मध्ये यावे अशी माझी विनंती आहे. मीडियामध्येही चांगली माणसे खूप आहेत. आम्ही प्रामाणिक आणि इतर सारे चोर, ही आमची भाषा असल्याचे मीडियानेच पसरवले. मीडियाला भ्रष्ट म्हटले म्हणून आपल्याला काही आक्षेप?

अंबानी-अंबानी घोकल्याबद्दल..
भास्कर : तुम्ही ‘अंबानी-अंबानी’ करता. हा देशासाठी इतका महत्त्वाचा मुद्दा आहे? की अंबानींवर एफआयआर दाखल करण्याची हिंमत फक्त तुमच्यात आहे अशी छाप पाडायचीय?
केजरीवाल : छाप पडेल की नाही, माहीत नाही. मात्र, मुकेश अंबानीच देश चालवत आहेत ही गोष्ट नाकारता येत नाही. जनतेला याबद्दल माहीतच नाही. ज्या दिवशी सत्य बाहेर येईल तेव्हा त्यांना उमगेल की, मुकेश अंबानींच्या एका खिशात भाजप आणि दुसर्‍या खिशात काँग्रेस आहे.

जबाबदारी झटकल्याबद्दल..
भास्कर : केजरीवाल ‘हिट अँड रन’सारखे का वाटतात? आयआयटीनंतर खासगी नोकरी सोडली. आयआरएसनंतर आयकर खात्याच्या सरकारी नोकरीवर पाणी सोडले. अण्णांचे आंदोलनही सोडले. मुख्यमंत्री झाले, ते पदही सोडून दिले. आपण जबाबदार्‍या का सोडता?
केजरीवाल : हाच तर देशासाठी त्याग आहे. जीवन कोणत्या वळणावर येईल सांगता येत नाही. देवाने सोपवलेल्या जबाबदार्‍या योग्य रितीने पार पाडण्याचा माझा प्रयत्न आहे. शिवाय मी कुणाला दुखावलेले नाही.

भास्कर : नरेंद्र मोदींविरुद्ध निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे?
केजरीवाल : याचे उत्तर मी इतक्यात देऊ शकणार नाही. पण, देशासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे.

पुढे वाचा 'काँग्रेस सरकारने अवैध मार्गाने अंबानींना करून दिला 54 हजार कोटींचा फायदा'