आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Special Interview With Divya Marathi

मोदींवर केजरीवालांच्या भूमिकेने भाजप खुश, काँग्रेसची आगपाखड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दैनिक भास्कर व ‘दिव्य मराठी’त मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्या मुलाखतीने नव्या चर्चेला तोंड फोडले. काँग्रेसने केजरीवालांवर आगपाखड केली, तर ‘सत्य’ स्वीकारल्याबद्दल भाजपने स्तुतिसुमने उधळली. देशात मोदींची लाट असल्याची कबुली केजरीवाल यांनी पहिल्यांदाच या मुलाखतीत दिली होती.

भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी, सुधांशू त्रिवेदी म्हणाले, केजरीवालांच्या कबुलीत आश्चर्यकारक काही नाही. देश जे बोलतोय तेच ते सांगत आहेत. देशाचा मूड पाहूनच त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले, मोदी लाटेचे मत केजरीवालांचे आकलन आहे. त्यांना आपले भ्रम बाळगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवता येत नाही. शकील अहमद म्हणाले, केजरीवालांचा हाही एक खोटारडेपणा आहे. प्रत्यक्षात पडद्यामागे भाजप व आप एकच आहे. सोशल मीडियावर काहींनी हा संधीसाधूपणा तर काहींनी निवडणुकीनंतरचे डावपेच म्हटले आहे. वृत्तवाहिन्यांवरील चर्चांत सपा, जदयूसारख्या पक्षांनीही प्रतिक्रिया दिल्या.

कालपर्यंत मोदींवर आगपाखड करणारी व्यक्ती आज त्यांचे गुणगान गातेय, यामागे फिक्सिंग तर नसावे ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.