आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांचे आयुक्तांना समन्स, AAP चे दिल्ली पोलिसांविरोधी आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पोलिस आयुक्तांना समन्स पाठवले आहेत. दिल्लीच्या आनंदपर्वत परिसरात 19 वर्षांच्या मिनाक्षी नावाच्या तरुणीची हत्या आणि दिल्लीतील ढासळत असलेली कायदा व सुव्यवस्था या प्रकरणी हे समन्स पाठवण्यात आले आहेत. यात पोलिस आयुक्त बी.एस. बस्सी यांना सोमवारी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दिल्ली पोलिसांच्या विरोधात आंदोलन केले.

आपच्या यूथ विंगच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. त्यांच्यावर ताबा मिळवण्यासाठी पोलिसामनी वॉटर कॅनन (पाण्याचे फवारे)चा वापर केला. या प्रकरणामुळे दिल्ली पोलिस आणि केजरीवाल सरकार यांच्यात नव्याने संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापूर्वी शुक्रवारी केजरीवाल यांनी पोलिसांसाठी अपशब्दांचा वापर केला होता. पोलिस आयुक्तांनी त्यावर आक्षेप घेतला होता.

आयुक्तांकडून स्पष्टीकरण मागवले
दिल्लीचे गृहमंत्री सत्येन्द्र जैन यांनीही पोलिस आयुक्त बीएस बस्सी यांना पत्र लिहून 48 तासांत याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. पीडितेने अनेकवेळा तक्रार करूनही आनंद पर्वत मर्डर केसमध्ये आरोपींच्या विरोधात एफआयआर का दाखल करण्यात आला नाही? अशी विचारणा आयुक्तांकडे करण्यात आली आहे. तसेच आधी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याबाबतही उत्तर मागवण्यात आले आहे. शनिवारी हत्या करण्यात आलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचलेल्या केजरीवाल यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. तसेच मीनाक्षी यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. दिल्ली पोलिस पंतप्रधानांच्या अख्त्यारित येतात. त्यामुळे त्यांनी याबाबत काहीतरी करावे अन्यथा दिल्ली पोलिस आमच्या ताब्यात द्यावे, असे केजरीवाल म्हणाले.

मिनाक्षी प्रकरण काय?
गुरुवारी दोन आरोपी जयप्रकाश आणि त्याच्या भावाने 11 वीची विद्यार्थीनी असलेल्या मिनाक्षीच्या चेहरा, छाती आणि पोटावर चाकूने 35 वेळा वार केले होते. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात तिची आईही चांगलीच जखमी झाली होती. त्या दोघांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण मिनाक्षीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मिनाक्षीने 2013 मध्ये या दोघांच्या विरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली होती.
पुढील स्लाइड्सवर संबंधित फोटो, आणि केजरीवालांनी आयुक्तांना पाठवलेले पत्र...
बातम्या आणखी आहेत...