आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Takes On BJP Over Issues Of Women's Rights, Security

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या काळात दिल्लीमध्ये वाढल्या अत्याचाराच्या घटना - केजरीवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना भाजपचे प्रमुख लक्ष्य ठरलेले आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. या सरकारच्या कार्यकाळातच दिल्लीत बलात्कार ३० टक्क्यांनी तर छेडछाडीचे प्रकार २५ टक्क्यांनी वाढले असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला.

एका पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, "२०१३ मध्ये दिल्ली परिसरात बलात्काराच्या एकूण १५७१ घटना घडल्या होत्या. मात्र, २०१४ मध्ये मोदी सरकारच्या काळातील पहिल्या सात महिन्यांतच २०६९ घटना घडल्या. २०१३ मध्ये मुलींची छेड काढण्याचे ३३४५ प्रकार घडले होते. तर, २०१४ मध्ये एनडीएच्या शासनकाळात ४१७९ प्रकार घडल्याची नोंद आहे.'

आरोपीला मंत्री केले : भाजपने बलात्काराच्या एका प्रकरणात आरोपी असलेले निहाल सिंह यांना केंद्रात मंत्री केले असल्याचा अरोप केजरीवाल यांनी केला. त्यांच्याकडे दिल्लीतील काही जागांचे प्रभारी म्हणून जबाबदारीही सोपवण्यात आल्याचे केजरीवाल म्हणाले. अशा पक्षाकडून महिलांच्या सुरक्षिततेची अपेक्षा कशी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर महिलांना स्वातंत्र्य देण्याच्या विरोधात आहे. महिलांनी घराबाहेर पडू नये, असेच भाजपचे धोरण आहे. उलट आमची आम आदमी पार्टी महिलांना पूर्ण स्वातंत्र्य देऊ इच्छिते. जेणेकरून महिलांना सुरक्षिततेची जाणीव व्हायला हवी.

सीसीटीव्ही काढले
राजधानी दिल्लीत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आम आदमी पार्टीने ठरवले हाेते. यासाठी जनतेशी चर्चा केली होती. आपच्या आमदारांनी चार-चार कोटी खर्च करून ठिकठिकाणी कॅमेरेही लावले आहेत. याउलट केंद्र सरकारने ओबामा यांच्या दौर्‍याच्या वेळी दिल्ली परिसरात लावलेले सुमारे १५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे काढून सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला.