आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Takes On Modi On Receiving Fund From Mukesh Ambani

अंबानी बंधुंचा स्विस बॅंकेत \'ब्लॅक मनी\', केजरीवालांनी सादर केले पुरावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश आणि अनिल अंबानी या बंधुंचा विदेशात मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी (काळा पैसा) असल्याचा आरोप 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज (शुक्रवारी) केला. एवढेच नव्हे तर केजरीवाल यांनी पुरावा म्हणून अंबानी बंधुंचे दोन बॅंक खाते क्रमांकही जाहीर केले आहेत. ( 5090160983, 5090160984 जिनेव्हामधील एचएसबीसी बॅंकेचे खाते क्रमांक.) या दोन्ही खात्यांवर अंबानी बंधुंनी मोठी माया गोळा करून ठेवल्याचा दावाही केजरीवाल यांनी यावेळी केला.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आली आणि मोदी पंतप्रधान झाले तर स्विस बॅंकेत जमा असलेला 'ब्लॅक मनी' ते भारतात परत आणणार काय? असाही सवाल केजरीवाल यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात विचारला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मुकेश अंबानी यांच्याकडून देणगी कधीच नाही, म्हणाले केजरीवाल...