आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Taking Oath As A Delhi CM, Know About India\'s CM Assets, Latest News

\'आम आदमी\' अरविंद केजरीवाल देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांपेक्षा शंभर पटीने श्रीमंत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'आम आदमी'च्या हक्कासाठी लढणारे आम आदमी पक्षाचे (आप) अरविंद केजरीवाल हे देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांच्या तब्बल शंभरपटीने श्रीमंत आहेत. त्रिपुराचे माणिक सरकार हे देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री ठरले आहेत. माणिक सरकार यांच्याकडे अन्य राज्यांच्या मुख्यमंत्रीच्या तुलनेत फक्त 2.5 लाख रुपयांची संपत्ती आहे.

दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या 28 डिसेंबर 2013 ला शपथ घेतली. या दिवशी केजरीवाल दाम्पत्य आता कोट्यधीश मुख्यमंत्री दाम्पत्यांच्या यादीतही सहभागी झाले. केजरीवाल दाम्पत्याकडे एकूण 2.10 कोटींची संपत्ती आहे.
अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 93.62 लाख रुपयांची संपत्ती आहे. यात गाझियाबाद (यूपी) येथील 'इंद्रापुरम'मधील 55 लाख रुपये किमतीचा फ्लॅट, हरियाणातील करनाल जिल्ह्यातील शिवानीमधील 37 लाख रुपयांच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. याशिवाय नवनिर्वाचीत मुख्यमंत्र्यांकडे 1.62 लाख रुपयांच्या बॅंक ठेवी आणि पाच हजार रुपये रोख. तसेच केजरीवाल यांच्या नावावर एकूण 23 हजार रुपयांची थकबाकी आहे. केजरीवाल यांनी 23 हजार रुपयांचे विद्युत बिले थकवली आहेत.
उल्लेखनिय म्हणजे, केजरीवाल यांच्या पेक्षा त्यांची पत्नी सुनीता यांच्याकडे अधिक संपत्ती आहे. निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या माहितीनुसार, सुनीता केजरीवाल यांच्या नावावर गुडगावमध्ये एक कोटी रुपयांचा बंगला, नऊ लाख रुपयांचे दागिने तसेच 16.85 लाख रुपयांच्या बॅंक ठेवी आणि दहा हजार रुपये रोख.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, देशातील विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबाबत...