आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal To Announce Decision Of Forming Government In Delhi

अरविंद केजरीवाल होणार दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री, रामलीला मैदानावर शपथविधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- 'आम आदमी पार्टी'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्‍लीत सरकार स्‍थापन करणार असल्‍याची घोषणा केली. केजरीवाल मुख्‍यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सरकार स्‍थापन करावी की नाही, याबाबत 'आप'ने दिल्‍लीतील जनतेचे मत मा‍गविले होते. ही प्रक्रीया रविवारपर्यंत सुरु होती. त्‍यानंतर आज (सोमवारी) केजरीवाल यांनी सरकार स्‍थापनेची घोषणा केली. 'आप'च्‍या कार्यालयात पक्षाच्‍या नेत्‍यांची बैठक झाली. त्‍यानंतर पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल यांनी निर्णय जाहीर केला. त्‍यानंतर त्‍यांनी नायब राज्‍यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन सरकार स्‍थापनेचा दावा केला. केजरीवाल यांचा शपथविधी रामलीला मैदानावर होणार आहे. राष्‍ट्रपतींच्‍या मंजुरीनंतर तारीख्‍ा निश्चित होणार आहे. शपथविधी 26 डिसेंबरला होण्‍याची शक्‍यता जास्‍त आहे.


टीम केजरीवालमध्‍ये कोणाचा होणार समावेश... कोण होणार दिल्‍लीत मंत्री... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...