आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal To Hold Rally For Dissolution Of Delhi Assembly Today

आज निवडणूक झाली तर 40, ऑक्टोबरमध्ये 50, फेब्रुवारीत 55 जागांचा केजरींचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीतर्फे राजधानी दिल्लीत रविवारी शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी आयोजित रॅलीस मार्गदर्शन करताना पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा भंग करून नव्याने निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली. ते म्हणाले, जनतेला पुन्हा निवडणुका हव्या आहेत.
जंतर-मंतर येथे आयोजित रॅलीत केजरीवाल यांनी भाजप आणि उपराज्यपालांवर निशाणा साधला. वाढती महागाई आणि वीज भारनियमनावरुनही त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, 'चार - पाच महिन्यात दिल्लीत आम आदमी पार्टीची सत्ता येणार आहे. जर आज निवडणुका झाल्या तर, 40 जागा मिळतील. ऑक्टोबरमध्ये निवडणूक झाली तर पक्षाला 50 आणि फेब्रुवारीमध्ये निवडणुका झाल्या तर 55 जागा मिळतील.' निवडणुकीचे भविष्य वर्तवण्याबरोबरच केजरीवाल यांनी एक आठवड्यात विधानसभा भंग करुन निवडणुकीची घोषणा केली नाही तर, घरोघर जाण्याचा इशारा दिला आहे.
'काँग्रेस - भाजपची सोयरीक 'आप'ने तोडली'
केजरीवाल म्हणाले, 'भाजपने एक सर्वेक्षण केले आहे, त्यात ते निवडणुक हारणार असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे भाजप निवडणुकीला सामोरे जाण्याचे टाळत आहे. त्यांनी आपच्या आमदारांना विकत घेण्याचाही खूप प्रयत्न केला, मात्र एकही आमदार त्यांच्या गळाला लागला नाही. काँग्रेस आणि भाजप यांची सोयरीक पक्की झाली होती. काँग्रेसचे सहा सदस्य भाजपमध्ये जाणार होते. हा विवाह नक्की झाला होता. त्यासाठी काँग्रेसला 20-20 कोटींचा हुंडा देण्याचेही ठरले होते. मात्र, 'आप'ने हे लग्न मोडले.'

पुढील स्लाइडमध्ये, आपचे जंतर-मंतरवर शक्तीप्रदर्शन

(सर्व छायाचित्र भूपिंदर सिंग)