आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल लखपती, पत्नी सुनीता कोट्यधीश; फिरतात अंबर दिव्याच्या गाडीतून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - असे म्हटले जाते, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. अरविंद केजरीवाल यांच्या यशातही त्यांच्या पत्नीचा - सुनीता यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची प्रथम भेट आयआयटी खरगपूर येथे झाली. तेव्हा केजरीवाल आयआयटी खरगपूर येथे शिक्षण घेत होते. आज यशोशिखरावर असलेले अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सुनीता यांनी देखील अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत. घर आणि कुटुंबाच्या जबाबदारीसोबत अरविंद यांना त्यांच्या कार्यात मदत करणे ही त्यांच्यासाठी मोठी कसरत होती.
आज (शनिवार) दिल्लीचे सातवे मुख्यमंत्री बनलेले अरविंद केजरीवाल याआधी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये (आयआरएस) सह आयुक्त होते. 2006 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांची पत्नी सुनीता या देखील आयआरएस आहेत. सध्या त्या दिल्लीमध्ये सहायक संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांची सध्याची कमाई अरविंद यांच्यापेक्षा जास्त आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल यांनी लाल दिव्याला नकरा दिला आहे, तर त्यांची पत्नी आजही लाल दिव्यच्या गाडीतून ऑफिसमध्ये जाते.
केजरीवाल यांनी उमेदवारी दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 93 लाख रुपयांची संपत्ती आहे आणि 23,550 रुपये वीज बीलाची थकबाकी आहे. त्यासोबतच त्यांनी जाहीर केले होते, की त्यांच्याकडे रोख आणि बँकेतील ठेव मिळून 1.6 लाख रुपये आहेत. उत्तरप्रदेशमधील गाझीयाबाद जिल्ह्यातील इंद्रापुरम येथे जागा आणि हरियाणा मधील करनाल जिल्ह्यातील शिवानी गावात वडीलोपार्जित शेत जमीन आहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, सुनीता केजरीवाल यांची संपत्ती