नवी दिल्ली - दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुखाची नियुक्तीचा वाद थांबण्याचे दृष्टीक्षेपास येताच मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांनी उप राज्यपाल (एलजी) यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी स्वाक्षरी करून फाइल पाठवण्याचा मुद्दा लिहिला असून, एलजीवर हुकूमशाहीचा आरोपही केला आहे. शिवाय, आम्ही हरलो असून, पंतप्रधान जिंकलेत, असा टोमणासुद्धा या पत्रातून केजरिवाल यांनी मारला आहे.
‘कुणी व्यक्ती स्वत:च सरकार कशी होऊ शकते ?’
केजरीवाल यांनी लिहिले, "एलजी साहेबांचे म्हणणे आहे की, ते स्वत:च दिल्ली सरकार आहेत... हे कसे शक्य आहे....? एक व्यक्ती स्वत:ला सरकार कसे म्हणू शकते...? अशाने तर दिल्लीमध्ये हुमूमशाही अवतरेल... यापेक्षा दुसरा मोठा कोणताच नाही... दिल्ली सरकारचा अर्थ आहे लोकांनी निवडून दिलेले शासन ते कुण्या एका व्यक्”ीचे नाही..."
‘तुम्ही जिंकले, मी हरलो’
अरविंद केजरीवाल यांनी लिहिले, " आमच्यासाठी महिला आयोगाचा मुद्दा महत्त्वाचा नाही तर तो अती महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. त्यामुळे एलजी साहेब, पंतप्रधान जिंकले आणि आम्ही सगळे हरलोत... तुमच्याकडे महिला आयोगाची फाइल पाठवत आहे... त्यावर साइन करून महिला आयोग काम लवकरात लवकर सुरू करा..."
या वादामध्ये एलजी कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पत्र देण्यात आले होते. त्यात म्हटले होते की, 2002 च्या गृह मंत्रालयाच्या नोटिफिकेशननुसार, दिल्लीमध्ये सरकारचा अर्थ म्हणजे उपराज्यपाल (एलजी) आहे.
काय आहे वाद?
या सगळ्या प्रकाराचा वाद डीसीडब्ल्यूच्या प्रमुखाच्या नियुक्तीवरून सुरू झाला. दिल्ली सरकारने या पदावर स्वाती मालिवाल यांची नियुक्ती केली. पण, एलजी यांच्याकडून ही निवड रद्द करण्यात आली. शिवाय दिल्ली सरकाने या निवडीकरिता एलजी ऑफिसकडून मंजुरी घेतले नसल्याचेही त्यांनी म्हटले.