आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आप\'चे \'डर्टी पॉलिटिक्स\' सुरुच, दिल्लीच्या उपराज्यपालांना म्हटले काँग्रेसचे \'एजंट\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यावर अडून बसले आहे. मात्र हे विधेयक घटनाबाह्य असल्याचे देशाचे सॉलिसिटर जनरल मोहन परासरन यांनी सांगितल्याने आपचा तिळपापड झाला आहे. तसेच हे विधेयक मंजूर करण्यापूर्वी उपराज्यपाल व केंद्र सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता असल्याने केजरीवाल सरकार आंदोलनाच्या भूमिकेत आहे. त्यामुळेच चिडलेल्या आपने उपराज्यपाल नजीब जंग यांना काँग्रेसचे एजंट म्हटले आहे.
उपराज्यपालांसारख्या घटनात्मक पद असलेल्या व्यक्तीवर अशी टीका केल्याने आम आदमी पक्षाने राजकीय व सांस्कृतिक सभ्यता सोडून दिल्याची टीका आता होऊ लागली. आम्ही म्हणेल तेच घडले पाहिजे हा हट्ट धरणे म्हणजे या पक्षाची अराजकतेकडेच वाटचाल सुरु असल्याचे तज्ज्ञांचे मत बनत चालले आहे. आम आदमीचे प्रवक्ते आशुतोष यांनी जंग यांना काँग्रेसचे एजंट म्हटले आहे. विशेष म्हणजे जंग हे एका वृत्तवाहिनीचे संपादक राहिले आहेत. त्यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने अशी टीका केल्याने पक्षाची वैचारिक दिवाळखोरीच उघड होत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, की दिल्ली लोकपाल 2014 हे विधेयक मंजूर करण्यापूर्वी पाच कायदेतज्ज्ञांचे मत विचारात घेतले होते. त्यांनी सांगितले आहे की, एखाद्या विधानसभेला विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्राची परवानगी घेण्याची आवश्यकता नसते. या तज्ज्ञांमध्ये माजी सॉलिसिटर जनरल आणि सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधिशांचा समावेश आहे.
पुढे वाचा, काँग्रेस-भाजपने काय टीका केली आपवर...