आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal\'s Open Debate Accept Makan, But Bedi Say No

अरविंद केजरीवाल यांच्या खुल्या चर्चेला माकन यांची हा, तर बेदींची ना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या राजकारणात ड्रामा, डिबेट व डिलिव्हरीवरून वादंग सुरू झाले. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी त्याची सुरुवात केली. त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी आणि काँग्रेसचे नेते अजय माकन यांना चर्चेचे खुले आव्हान दिले. माकन यांनी ते स्वीकारले, पण बेदींनी हा प्रस्ताव फेटाळला.

केजरीवाल यांनी सकाळी ट्विट केले, ‘किरण बेदीजी, मी आपल्याला खुली चर्चा करण्यासाठी आमंत्रित करत आहे. चर्चेचे संचालन निष्पक्ष व्यक्तीने करावे आणि सर्व चॅनल्सनी ते प्रसारित करावे.’ त्यांच्या या निमंत्रणावर चॅनल्सनेही प्रसारण करण्यास सहमती दर्शवली. काँग्रेसचे प्रचार प्रमुख माकन चर्चेला तयार झाले. पण बेदी म्हणाल्या, ‘मला आव्हान मान्य आहे, पण मी चर्चा विधानसभेतच करेन. ते (अरविंद) डिबेटच करतात. माझा अनुभव डिलिव्हरीचा आहे.’
पुढे वाचा केजरीवालांच्या रोड शोला उदंड प्रतिसाद