आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीति आयोगाच्‍या उपाध्‍यक्षांना मिळणार कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा; केंद्र शासनाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली – केंद्र शासनाने स्‍थापन केलेल्‍या नीति‍ आयोगाच्‍या उपाध्यक्ष यांना कॅबिनेट तर इतर दोन सदस्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.
केंद्र सरकारने नियोजन आयोग ऱद्द करत नीति आयोगाची स्‍थापना केली. यावर विरोधकांकडून आताही टीका होत आहे. पंतप्रधान हे आयोगाचे अध्‍यक्ष आहेत तर उपाध्‍यक्ष अरविंद पनगारिया आहेत. आता यापुढे उपाध्‍यक्ष पनगारिया यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या शिवाय विवेक देबरॉय आणि व्ही. के. सारस्वत या दोन सदस्‍यांना राज्‍यमंत्रीपदाचा दर्जा दिला जाणार असून, त्‍यांना मंत्रीमंडळाच्‍या बैठकीचे आंमत्रण दिले जाणार आहे.