आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापूंचा जामीन अर्ज फेटाळला; तुरंगातही थाटबाट; दररोज स्नानासाठी मिळते गंगाजल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर/नवी दिल्ली- आसाराम बापू यांना राजस्थान कोर्टाने आज (बुधवार) झटका दिला आहे. कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे बापूंना 15 सप्टेबरपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. मा‍त्र कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आसाराम बापूचे वक‍िल लवकरच हायकोर्टात जाणार आहेत.

दुसरीकडे आसाराम बापूंचे समर्थकांनी पो‍लिसांना लाच देण्याचा प्रयत्नही केला. एवढेच नव्हे तर चौकशी अधिकारी डीसीपी ए के लांबा यांना धमकी देणारे पत्रही पाठवले आहे. धमकीचे पत्र उत्तर प्रदेशातून आले असल्याचे समजते. आसाराम बापूंविरोधात पोलिसांना ठोस पुरावे सापडले असल्याचे लांबा यांनी पत्रकारांना सांगितले आहे.

आसाराम बापूंचा थाटबाट...
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या 74 वर्षीय आसाराम बापूंचा थाटबाट सुरु आहे. बापू सध्या जोधपूर तुरुंगात विश्रांतीचा पूर्णानंद घेत आहेत. त्यांना तुरूंगातील नास्ता आवडत नसल्याने जेलरच्या घरून त्यांच्यासाठी खास दलिया बनवून आणला जात आहे. एवढेच नव्हे तर, बापूंच्या स्नानासाठी गंगाजलही मागविण्यात येत आहे.

दरम्यान, काल (मंगळवारी) बापूंच्या जामीन अर्जावरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आज (बुधवारी) होणार्‍या सुनावणीत त्यांच्या जामिनाचा निर्णय न झाल्यास त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत तुरुंगातच राहावे लागणार आहे.

आसाराम बापू यांना 31 ऑगस्टला अटक झाली होती. त्यानंतर त्यांनी राजस्थान सरकारला धमकी देत मध्य प्रदेश सरकारची प्रशंसा केली होती.

''राजस्थान सरकारने माझ्यावर कारवाई करण्यापूर्व आगामी निवडणुका लक्षात घेतल्या पाहिले. कायदा आणि सुरक्षेचा पूर्ण विचार करून राजकीय नेत्यांनी स्वत:ची खूर्ची कशी शाबूत ठेवता येईल, याचे भान ठेवावे. माझा एक भक्त दहा ते वीस लोकांना भारी आहे. मला अडवले तर निवडणुकीत फटका बसू शकतो. मी लादेन सारखा गुन्हेगार नाही. परंतु एक लक्षात ठेया चंदन घातल्यानंतरही आग प्रज्वलीत होऊ शकते'' अशी धमकी इंदूर येथील संत्सगात दिली होती.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'बर्‍याच महिलांना एकांतात भेटायचे आसाराम'