आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामबापूंमागील शुक्लकाष्ट सुटता सूटेना, जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्वयंघोषित अध्यात्मिक संत आसाराम बापू यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ अजून सुटण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे आसाराम यांना अजून काही दिवस तुरुंगातच राहावे लागणार आहे. बलात्काराच्या एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आसाराम यांचा जामीन अर्ज गुरुवारी फेटाळला. न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी त्यांना जामिनासाठी गुजरात हायकोर्टात जाण्यास सांगितले आहे.
दरम्यान, राजस्थानातील जयपूर येथील आश्रमातील दोन अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आसाराम बापूंवर आरोप आहे. या प्रकरणी आसाराम यांच्या जामीन अर्जावर कोर्टाने राजस्थान सरकारला नोटीस बजावली आहे. बलात्कार प्रकरणात आसाराम यांची जामीन याचिका जोधपूर कोर्टात प्रलंबित आहे. त्यावर येत्या 20 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

आसाराम ऑगस्ट 2013 पासून तुरुंगात आहेत. तसेच त्यांचा मुलगा नारायण साई हा देखील तुरुंगात आहे.