आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asaram Bapu News In Marathi, Divya Marathi, Supreme Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणावरून जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापू यांना प्रकृतीच्या कारणावरून जामीन देण्यास नकार दिला. आसाराम जोधपूर बलात्कार प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. वैद्यकीय तपासणीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.

जोधपूर वैद्यकीय पथकाने दिलेल्या अहवालाचा संदर्भ देत न्यायालयाने गेल्या पंधरा महिन्यांतील औषधोपचार पाहता जामीन देण्याची घाई वाटत नसल्याचे स्पष्ट केले. न्या. टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने मात्र त्यांना योग्य उपचार घेण्यास परवानगी दिली जाऊ शकते. याबरोबर महत्त्वाच्या साक्षीप्रसंगीच त्यांना तुरुंगातून बाहेर पडण्यास परवानगी दिली जावी, असे म्हटले आहे. राजस्थान सरकारला महत्त्वपूर्ण साक्षीदारांची नावे १४ ऑक्टोबरच्या सुनावणीत देण्यास सांगितली आहेत. आसाराम यांच्या वकिलाने पहिल्यांदा युक्तिवादाची संधी द्यावी, अशी विनंती केली होती. न्यायालयाने ती फेटाळली.

अल्पवयीन आणि प्रौढ असा वयाचा मुद्दा नाही. तुम्हाला सुनावणीमध्ये अडथळा आणण्याची इच्छा आहे, या शब्दांत न्यायालयाने फटकारले. सर्वोच्च न्यायालयाने आसाराम यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.