आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आसाराम म्‍हणाले, 'सर्व मिळून देत आहेत मला त्रास'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्याचार प्रकरणातील आरोपी आसाराम बापू यांना अखेर शनिवारी रात्री 12.30 वाजता जोधपूर पोलिसांनी इंदूरच्या आश्रमातून अटक केली. आसाराम बापू यांना घेऊन पोलिस जोधपूरमध्‍ये दुपारी 12 वाजताच्‍या सुमारास दाखल झाले. बापूंना शनिवारी रात्री उशिरा आश्रमातून बाहेर आणण्यात आले आणि 8 कारच्या ताफ्यासह विमानतळावर नेण्यात आले. जोधपूर पोलिसांनी बापूंना तवेरा गाडीत बसवले, तेव्हा सर्मथकांनी प्रचंड गदारोळ केला. परंतु पोलिसांनी जुमानले नाही. लाठीमार करत सर्मथकांना आश्रमाबाहेर पडू दिले नाही. गाडीत मध्यभागी बापू तोंड झाकून घेतलेल्या अवस्थेत होते. सकाळी पहिल्या फ्लाइटने दिल्लीमार्गे त्यांना जोधपूरला नेण्यात आले. विमानातही ते कोणाशीच बोलले नाही. त्‍यांचे डोळे सुजलेले होते. जोधपूरमध्‍ये मात्र पत्रकारांनी त्‍यांच्‍यावर प्रश्‍नांचा भडीमार केला. त्‍यावेळी ते एकच वाक्‍य बोलले, 'सर्व मिळून मला त्रास देत आहेत.'

आसाराम समर्थक आक्रमक झाले असून रविवारी दुपारी त्‍यांनी उल्हासनगरमध्ये रेल रोको आंदोलन केले. यामुळे मध्य रेल्वेवरील कल्याण-कर्जत या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईत आज मेगाब्‍लॉक असल्‍यामुळे जनता आधीच त्रस्‍त होती. त्‍यात या आंदोलनामुळे आणखी मनस्‍ताप झाला. सुमारे 100 ते 150 समर्थकांनी उल्‍हासनगर रेल्‍वे स्‍थानकाजवळ रेल रोको केले.

नवी दिल्‍लीत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्‍या निवासस्‍थानाबाहेर निदर्शने करण्‍यात आली. निदर्शकांनी आसाराम बापूंना फासावर चढविण्‍याची मागणी केली आहे. दुसरीकडे जंतरमंतर येथे आसाराम बापुंच्‍या समर्थकांनी निदर्शने केली. दिल्‍ली विमानतळाबाहेरही समर्थकांनी नारेबाजी केली. अहमदाबाद येथेही संतप्‍त नागरिकांनी आसाराम बापुंच्‍या विरोधात निदर्शने केली.