आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asaram Bapu Receives Summons, Denies Sexual Assault Charges

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लैंगिक शोषणाचा आरोप करणारी मुलगी खोटारडी, आसाराम बापूंची प्रतिक्रिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- माझ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी मुलगी खोटारडी असून तिने दबावाला बळी पडून माझ्यावर आरोप केले आहेत, असे स्पष्टीकरण आसाराम बापूंनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना आसाराम बापूंनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील एका हॉटेलमध्ये बोलावून आसाराम बापूंनी लैंगिक शोषण केले, अशी तक्रार एका १६ वर्षीय मुलीने दिल्ली पोलिसांना दिली आहे.

याबाबत आसाराम बापू म्हणाले, की माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत किती खोटारडेपणा आहे हे येत्या काही दिवसांत उघडकीस येईल. तिच्यावर कोणत्याही प्रकारचे लैंगिक अत्याचार झाले नाहीत, असे संबंधित मुलीने तिच्या मैत्रिणीला सांगितले आहे. माझा दावा पटवून देण्यासाठी मी संबंधित मुलीच्या मैत्रिणीला सादर करू शकतो. ज्या दिवशी संबंधित मुलीने लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले आहे, त्या दिवशी मी जोधपूर येथे नव्हतो. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

दरम्यान, जोधपूर पोलिसांनी आज आसाराम बापूंना या प्रकरणी समन्स जारी केले. समन्स मिळाल्यानंतर चार दिवसांमध्ये पोलिस चौकशीसाठी येण्याचा आदेश आसाराम बापूंना देण्यात आला आहे.