Home »National »Delhi» Asaram Bapu Sex Scandal Jodhpur

बलात्कार प्रकरणी आसाराम बापुंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

दिव्यमराठी वेब टीम | Aug 23, 2013, 11:38 AM IST

नवी दिल्ली- एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापुंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. बापुंना अटक करण्यासाठी दिल्ली पोलिस होमवर्क करीत असल्याचे समजते. दरम्यान, बलात्काराची तक्रार नोंदविण्यात आल्यावर राजस्थान, उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये त्यांचे प्रतिकात्मक चित्र जाळण्यात आले आहेत.

आसाराम बापुंनी राजस्थानमधील एका हॉटेलमध्ये बलात्कार केल्याची तक्रार एका 16 वर्षीय मुलीने दिली आहे. दिल्ली पोलिसांनी बलात्काराची तक्रार नोंदविली असून हे प्रकरण राजस्थान पोलिसांकडे हस्तांतरीत केले आहे. आता या प्रकरणी राजस्थान पोलिस पुढील कारवाई करणार आहे. परंतु, आसाराम बापुंना अटक करण्यासाठी पोलिसांनी तयारी केल्याचे समजते. बापुंना अटक झाल्यावर त्यांचे भाविक गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने ही तयारी करण्यात येत आहे.

पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आसाराम बापुंची प्रतिकात्मक चित्रे जाळून त्यांचा अटकेची मागणी केली आहे.

Next Article

Recommended