आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Showed Potency Even Without Stimulation Medicines

विनाऔषध पहिल्‍याच टप्‍प्‍यात आसाराम बापूंचा \'पुरुषार्थ\' झाला सिद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप असलेले आसाराम बापू यांना न्यायालयाने सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. भंवरीकांडातील राजस्थानचे बडतर्फ मंत्री मदेरणा यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीतच आसारामबापू यांची रवानगी झाली आहे. आज आसाराम बापूंच्‍या जामीन अर्जावर आज (मंगळवार) सुनावणी होणार आहे. आसाराम बापूंनी काल पुरुषार्थ चाचणी पास केली होती. त्‍यामुळे ते लैंगिक शोषण करण्‍यास सक्षम असल्‍याचे सिद्ध झाले होते. परंतु, त्‍यांनी ही चाचणी केवळ 'पास' केली नाही, तर ते त्‍यात प्राविण्‍य श्रेणीत उत्तीर्ण झाले असे म्‍हणता येईल. त्‍यांची चाचणी घेणा-या 3 डॉक्‍टरांचे पथकही चकीत झाले. कोणत्‍याही औषधाविना त्‍यांनी पोटेंसी चाचणी पास केली.

डॉक्‍टरांनी सांगितल्‍यानुसार, आसाराम बापूंची पोटेंसी पहिल्‍याच टप्‍प्यात सिद्ध झाली. पहिल्‍या टप्‍प्‍यात स्‍पर्ष करुन उत्तेजना होते का, याची चाचपणी करण्‍यात येते. आसाराम बापूंमध्‍ये काही सेकंदातच उत्तेजना दिसली. सर्वप्रथम त्‍यांनी चाचणीस नकार दिला होता. परंतु, नंतर त्‍यांनी होकार दिला. शरीर नाशवंत आहे. त्‍यामुळे डॉक्‍टर काहीही करु शकतात, असे प्रवचन देऊन त्‍यांनी चाचणीस परवानगी दिली. या चाचणीसाठी दोन तास लागले.

74 वर्षीय आसाराम बापूंनी सर्वप्रथम आपण नपुंसक असून कोणाचेही शोषण करण्‍यास सक्षम नसल्‍याचा दावा केला होता. परंतु, या चाचणीने त्‍यांचे सर्व दावे फोल ठरविले.

आसाराम बापूंच्‍या अटकेमागे आहेत राजकीय डावपेच.... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये..