आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Asaram Bapu Used To Touch Private Parts Of Girls In The Name Of Blessing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा तर मॅडम आणि त्‍यांच्‍या मुलाचा माझ्याविरुद्ध कटः आसाराम बापुंचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट/नवी दिल्ली- बलात्‍काराच्‍या आरोपांमुळे वादात अडकलेले आसाराम बापू प्रसार माध्‍यमांवर भडकले. राजकोटमध्‍ये एका पत्रकार परिषदेत त्‍यांनी बाजू मांडण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, प्रश्‍नांच्‍या सरबत्तीवरुन ते संतप्‍त झाले. गेल्‍या चार वर्षांपासून आपल्‍याविरुद्ध कट रचण्‍यात येत असून मॅडम आणि त्‍यांच्‍या मुलाच्‍या इशा-यावरुन सर्वकाही होत असल्‍याचा खळबळजनक खुलासा त्‍यांनी केला.

आसाराम बापू म्‍हणाले, मी कोणत्‍याही पक्षाचा विरोध करु इच्छित नाही. मात्र, लोकांकडून मला समजले की मॅडम आणि त्‍यांच्‍या मुलाच्‍या इशा-यावरुन सर्वकाही होत आहे. या मुद्यावरुन पत्रकारांनी त्‍यांना सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर आरोप करीत आहात का, असे विचारले. त्‍यावर आसाराम बापू उत्तरले, मी कोणावर आरोप करत नाही. मी जे ऐकले ते सांगत आहे. यावर पत्रकारांनी पुन्‍हा प्रश्‍न केला, की उमा भारती त्‍यांचा बचाव करत आहेत का? त्‍यावर आसाराम बापू भडकले. अतिशय चिडून ते म्‍हणाले, कोणताही पक्ष माझा बचाव करत नाही. तुम्‍ही मला त्रास देऊ नका. त्‍यानंतर आसाराम बापुंचे समर्थकही संतप्‍त झाले आणि नारेबाजी करु लागले. त्‍यामुळे पोलिस आसाराम बापुंना तिथून घेऊन गेले.

याआधी गुरुवारी सकाळीही त्‍यांचे आणि पत्रकारांचे खटके उडाले. सुरतहून मुंबईमार्गे ते विमानाने भोपाळला पोहोचले. भोपाळ विमानतळावरच त्‍यांचे पत्रकारांसोबत खटके उडाले. त्‍यावेळी आसाराम बापू म्‍हणाले, माझ्याविरुद्ध कट असल्‍यामुळेच मी ठरविले आहे की मला तुरुंगात पाठविल्‍यास मी अन्‍नपाण्‍याचा त्‍याग करीन. कारण मला काहीतरी खाऊ घालतील.

आणखी एका मुलीने केला आसाराम बापुंवर आरोप, मोदींनी समर्थन करणा-या नेत्‍यांना दिला इशारा... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...