नवी दिल्ली/जोधपूर - लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुरूंगात असलेले आसाराम आणि त्यांचे चिरंजीव नारायण लोकांचे भवितव्य ठरवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. नारायणने सुरू केलेल्या 'ओजस्वी' पक्षाने दिल्लीत होणा-या आगामी विधानसभा निवडणुकीत 70 उमेदवार मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय राजकीय सल्लागार मुकेश जैन यांनी तुरूंगात आसाराम यांच्या सोबत पार पडलेल्या संक्षिप्त बैठकीनंतर विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले.
पक्षाचे अध्यक्ष ओम यांनी सांगितले की, मी आसाराम यांची याबाबत भेट घेतली त्यावेळी त्यांनी दिल्लींच्या निवडणुकांमध्ये उमेदवार उरतवण्यासाठी होकार दिला आहे. आसाराम यांच्या 'ओजस्वी' पक्षातर्फे दिल्लीतील सर्व 70 जागांवर उमेदवार उतरवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, मंगळवारी तुरूंगात (आसाराम) बापूंची भेट घेतल्यानंतर मिळालेल्या संकेतानंतर आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आश्रमातील एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापू मागील एक वर्षापासून जोधपुरच्या केंद्रीय कारागृहात आहेत.