आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापूनी कुठे भूखंड दान घेतले, तर कुठे काही बळकावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसारामबापूंचे एकूण चारशेहून अधिक आश्रम आहेत. मात्र, यातील निम्म्याहून अधिक वादग्रस्त ठरले. बळजबरी भूखंड बळकावण्यापासून गंभीर आरोप त्यांच्यावर झाले. ‘दै. भास्कर’ने बापूंच्या संपत्तीचा आढावा घेतला..

0 मोहालीमध्ये 2002 मध्ये 55 एकर जमीन खरेदी केली. 2006 मध्ये शेड बांधले. पंजाब लँड रिझव्र्हेशन अँक्टनुसार येथे बांधकामाची परवानगी नाही. येथे फ्लॅट बांधून विकण्याची तयारी सुरू होती. प्रशासनाने थांबवल्यावर प्रकल्प बंद आहे.

0 नवी दिल्लीत वंदे मातरम् रोडवर 1996 मध्ये महापालिकेने एक एकरपेक्षा अधिक भूखंड बापूंना दिला. वास्तविक हे वनक्षेत्र घोषित आहे. यातील एक फूट जमीनही कुणाला देता येत नाही. आज बापूंच्या ताब्यात साडेतीन एकर जागा आहे.

0 बांसवाडाच्या दिवडा गावात पंचायतने सुमारे चार एकर (10 बिघा) जमीन आश्रमासाठी दिली. मात्र, येथे आश्रम बांधलाच गेला नाही. येथे शेती सुरू झाली. जवळच्या गावात मंदिर आणि धर्मशाळेसाठी मोकळी सोडलेली सुमारे सहा एकर जमीन हडपून तेथेच आश्रम बांधण्यात आला.

0 रतलाममध्ये जयंत व्हिटामिनची जमीन 11 दिवसांसाठी रोज एक हजार भाडेतत्त्वावर प्रवचनासाठी घेण्यात आली. 11 वर्षे झाली तरी ती कंपनीला परत केलेली नाही. सुमारे 750 कोटींची ही जमीन बापूंनी हडपली. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे.

0 ग्वाल्हेरमध्ये 14 बिघा जमीन बळकावण्यापासून प्रारंभ झाला. प्रशासनाने अतिक्रमण काढले तेव्हा सुमारे एक एकरवर एसी कुटिया उभारली गेली होती. प्रशासनाच्या हाती केवळ 11 बिघा जमीन लागली. यातील 10 बिघा जमीन बापूंनी खरेदी केली. आज या भागात 20 बिघा (8 एकर) जमिनीवर बापूंचा कब्जा आहे.

0 सागरमध्ये मझगुवा गावात 200 एकर जमिनीवर बापूंचा ताबा आहे. देवजानकीरमण मंदिराचे पुजारी प्रेमनारायण उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार बापूंनी ही मालमत्ता हडपलेली आहे. हायकोर्टात उपाध्याय यांनी खटला जिंकला आहे. मात्र, अजूनही यावर बापूंचाच कब्जा आहे.
0 223 एकरांचे मालक
0 588 एकरांवर कब्जा
01.5 हजार कोटींहून अधिक किमतीची जमीन