आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम यांच्या शार्प शूटरचा दावा, पसंतीच्या साधिकेसोबत लावून दिले होते लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/अहमदाबाद- आश्रमातील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक संत आसाराम यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आसाराम यांच्याविरोधात तीन साक्षीदारांच्या हत्येचा आरोप असलेला शार्प शूटर कार्तिकने नवा व धक्कादायक खुलासा केला आहे. आसाराम यांनी आश्रमातील आवडत्या साधिकेसोबत कार्तिकचे लग्न लावून दिले होते. त्याबदल्यात तो आसाराम यांच्यासाठी काम करत होता, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

शार्प शुटर कार्तिक उर्फ राजू दुलालचंद हलदर याला गुजरात एटीएस पथक व अहमदाबाद गुन्हे शाखेने छत्तीसगडमधील रायपूर येथून अटक केली. कार्तिक पश्चिम बंगालचा राहणारा
आहे. आसारामचा माजी सहाय्यक अमृत प्रजापतीची 14, जुलै 2015 मध्ये कृपालसिंह तसेच माजी खानसाम्या अखिल गुप्ताची हत्या झाली होती. त्यात कार्तिकचा हात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

कार्तिक 2000 मध्ये आसाराम यांचा अनुयायी बनला. त्याने दिल्लीतील सत्संगाला हजेरी लावली होती. त्यानंतर तो मध्ये तो आसाराम यांच्या मोतेरा आश्रमात दाखल झाला. साक्षीदारांवर हल्ला करण्यासाठी आश्रमातील अन्य साधकांनी आर्थिक साहाय्य केल्याचे त्याने सांगितले. देशी बनावटीचे 10 पिस्तुले आणि सात पिस्तुले आणि 94 काडतुसे झारखंड आणि उत्तर प्रदेशातील शस्त्र दलालांकडून पाठवल्याचेही कार्तिकने चौकशीत सांगितले आहे.

कार्तिकने आतापर्यंत अनेक खुलासे केले आहेत. आसाराम यांचा आत्मघातकी असल्याचे त्याने कबूल केले आहे. आहे. आसाराम यांनी त्याला लग्नसाठी आश्रमातील एक साधिका पसंत करण्यास सांगितले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, साक्षीदारांवरील हल्ल्यानंतर खूप खुश व्हायचा आसाराम...